Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नवीपेठ शहर बँक सभागृहात नवनीतभाई बार्शीकराची जयंती साजरी

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - अहमदनगर शहराच्या विकासात मोठा वाट असणारे कै.नवनितभाई बार्शीकर यांची जयंती पार पडली. यावेळी कै.बार्शीकर यांच्या प्रतिमेला शहर बँकेचे चेअरमन तथा जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. नवनीत विचार मंचाचे अध्यक्ष सुधीर मेहता, अहमदनगर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष मन्सूरभाई शेख, बाळासाहेब भुजबळ, शहर बँकेचे संचालक संजय घुले, डि.एम. कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार धनराज गांधी, आबीदभाई, दै. नगर स्वतंत्रचे संपादक सुुभाष चिंधे, अर्किटीक हर्षतभाई, बोरा आदिसह मान्यवर उपस्थित होते.

सुधीर मेहता म्हणाले की, नगरच्या गौरवशाली पत्रकारितेचा आढावा घेताना बाळासाहेब भारदे, वा.द कस्तुरे, रामभाऊ निसळ, गोवर्धनभाइ बार्शिकर या सर्वांच्या कार्याचा आढावा घेतला होता. आचार्य गुंदेचा यांचा दरारा धाक होता. नगरचा रिंगरोड डी झोन रेल्वेचे प्रश्न नगर व्यासपीठने गोपाळराव मिरिकरांच्या मार्गदर्शनाखाली धसास लावला, असा खूप मोठा वारसा आहे . भाई हे दैनिकाचे संपादक दै लोकयुगच्या माध्यमातून त्यानी इतिहास घडवला.. नगरवर अक्षरशः राज्य केले .. नगर पालिका अर्बन बॅंकेचे अध्यक्षपद आणि आमदारकी तिन्ही मुख्य सत्ता नगरकरानी एकाच वेळी भाइंच्या हाती विश्वासाने सोपवल्या आणि भाईनी हा विश्वास सार्थ ठरवला.. आजही विकास नेतृत्व म्हटले की सर्वानाच भाई आठवतात ..
एक पत्रकार म्हणून आणि या सर्व पत्रकारांबरोबर काम करण्याची संधी सुदैवाने मला मिळाली. भाइंच्या लोकयुग दैनिकाचा संपादक होण्याची सुसंधी मला नशीबाने मिळाली..अशा भाईची आज सोमवार दि.१३ जानेवारीला जन्म शताब्दी आहे, नुसती जयंती नव्हे .. महापालिका, नगर अर्बन बँक किंवा लोक प्रतिनिधींना साधी पुसटशी जाणीव, या चांगल्या शिल्पकाराच्या जयंती जन्म शताब्दीची नाही. ही खेदजनक आहे की, साधा महापालिकेमध्ये भाईचा फोटो सुद्धा नाही. परंतु भाई हे महान पत्रकार होते, हे दुर्लक्षून चालणार नाही, असे ते म्हणाले.
नगर शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यावर चर्चा करत असताना, व्हीजन २०५० ,, नगर विकासाचा आराखडा आपण तयार करु आणि पुन्हा एकदा नगरच्या ऐक्याची शक्ती परंपरा दाखवून देऊ असे मते मान्यवरांनी यावेळी मांडले. 
Post a Comment

0 Comments