Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खून, दरोडा गुन्ह्यातील आरोपी जेरबंद ; एलसीबी पथकाची कारवाईआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - खून व दरोड्या सारख्या गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्यास आरोपीस कानवडी (ता.खंडाळा, जि.सातारा) येथे पकडण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. सगड्या उंबऱ्या काळे (वय ३५, रा.सुरेगाव ता.श्रीगोंदा) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.१८ जानेवारीला पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग नं.६० नजिक घारगाव शिवारात असलेल्या हाँटेल प्राईड मालक आशिष कानडे यांचा खून करून हाँटेल प्राईड मधून ४० हजार रुपये रोख रक्कम व दारुच्या बाटल्या चोरून नेल्याप्रकरणी सुनिल बळीराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा सगड्या काळे व त्याच्या साथीदारांनी मिळून केला आहे. आरोपी काळे हा कानवडी (ता.खंडाळा जि.सातारा) येथे विटभट्टीवरील ओळखीच्या मजुरांकडे राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार पो.नि. पवार यांनी आपल्या पथकास सूचना दिल्या असता, शोध घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून आरोपी सगड्या काळे यास पकडण्यात आले. काळे याच्याकडे अधिक माहिती घेतली. त्याने हा गुन्हा भाऊ मिथून उंबऱ्या काळे (रा सुरेगाव ता.श्रीगोंदा), संजय हातन्या भोसले (रा.पुणेवाडी ता.पारनेर) मिळून केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी काळे याला पुढील तपासासाठी घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. काळे याच्या पारनेर, श्रीगोंदा, बेलवंडी आदि पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 
प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे, संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकातील सपोनि संदीप पाटील, सफौ. सोन्याबापू नानेकर, पोहेकाँ दत्ता हिंगडे, पोना सुनील चव्हाण, रविंद्र कर्डीले, आण्णा पवार, पोकाँ योगेश सातपुते, मच्छिंद्र बर्डे, प्रकाश वाघ, सागर सुलाने, सचिन कोळेकर आदींनी ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments