आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार (दि.२६) अहमदनगर पोलीस मुख्यालयातील सकाळी होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील विशेष तपास, गुन्हे उघड आणि चांगली प्रशासकीय कामगिरी केल्याबद्दल २१ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये याप्रमाणे मंदार मल्लिकार्जुन जवळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग), दिलीप शिशुपाल पवार ( स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस निरीक्षक), श्रीहरी रामचंद्र बहीरट ( पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे), अरुण भागीरथ परदेशी (पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे), दौलतराव शिवराम जाधव (पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा पोलीस ठाणे), संदिप भगवान पाटील (स.पो.नि.स्थानिक गुन्हे शाखा), पवन शंकर सुपनर (पो.उ.नि. एमआयडीसी पोलीस ठाणे, अ.नगर), पोहेकाँ मनोहर सिताराम गोसावी ( स्थानिक गुन्हे शाखा), पोहेकाँ दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे (स्थानिक गुन्हे शाखा), पो.ना. रविंद्र आबासाहेब कर्डिले (स्थानिक गुन्हे शाखा), पो.ना. संदीप कचरु पवार (स्थानिक गुन्हे शाखा), पोहेकाँ जालिंदर काशिनाथ लोंढे (श्रीरामपूर, शहर पोलीस ठाणे), पोकाँ किशोर सुभाष जाधव (श्रीरामपूर, शहर पोलीस ठाणे), पोहेकाँ योगेश मनोहर गोसावी (सायबर पोलीस ठाणे), पोकाँ अभिजित दत्तात्रय आरकल (सायबर पोलीस ठाणे), पोकाँ राहुल नरसय्या गुंडू (सायबर पोलीस ठाणे), पो.ना संदीप विक्रम चव्हाण (एमआयडीसी पोलीस ठाणे), पो.ना विजय विठ्ठल नवले (एमआयडीसी, पोलीस ठाणे), पोकाँ रशिद बादशहा शेख ( राहाता, पोलीस ठाणे), पोकाँ अजित अशोक पटारे (राहाता, पोलीस ठाणे), संतोष ज्ञानेश्वर बोळगे (श्रीगोंदा) आदिंचा सन्मान होणार आहे.
0 Comments