Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शहर स्वच्छतेसाठी सरसावले ज्येष्ठ नागरिक

हातात झाडू घेत भल्या सकाळी राबवली स्वच्छता मोहिम


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता सर्व्हेक्षण 2020 मध्ये नगर महापालिकेने सहभाग घेतलेला असून महापालिकेच्या या उपक्रमाला साथ देण्यासाठी शहरातील ज्येष्ठ नागरिकही सरसावले आहेत. शनिवारी (दि.25) भल्या सकाळी हातात झाडू घेत या वयोवृद्धांनी विनायकनगर परिसरात स्वच्छता अभियान राबवत परिसर स्वच्छ केला.
प्रभाग क‘.14 मधील कै. एस. के. देशपांडे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी हा उपक‘म राबवला. यामध्ये या ज्येष्ठ नागरिकांसमवेत नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार, उद्यान विभागाचे शशिकांत नजान, स्वच्छता विभागाचे किशोर देशमुख आदी सहभागी झाले होते.
नगरसेवक गणेश भोसले म्हणाले, ज्येष्ठ नागरिक हे समाजातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्यांना तोंड देत यशस्वी जीवन जगले आहेत. त्यांच्याकडे अनुभवाची मोठी शिदोरी असते. त्यामुळे तरुण पिढीने त्यांच्या या अनुभवाच्या शिदोरीचा उपयोग करुन घेणे गरजेचे आहे. नगर शहरात स्वच्छता अभियान सुरू आहे. या अभियानात आपलेही योगदान असावे यासाठी या ज्येष्ठ नागरिकांनी विनायकनगर परिसरात स्वच्छता अभियान राबवत तरुणांनाही लाजवेल असे काम केले आहे. प्रभाग क्र.14 हा गतवर्षी स्वच्छ, सुंदर व हरित प्रभाग ठरला होता. यावर्षीही या प्रभागाचा प्रथम क‘मांक कायम राहावा यासाठी ज्येष्ठ नागरिकांची सुरू असलेली धडपड वाखाणण्याजोगी आहे.
यावेळी उपायुक्त सुनील पवार म्हणाले, नगर शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्व नागरिकांची साथ या मोहिमेत मिळणे गरजेचे आहे. त्यानुसार शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर या स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन आपले योगदान देत आहेत. हे अभियान केवळ काही दिवसांपुरते न राहाता नगर शहर या पुढील काळातही सातत्याने स्वच्छ, सुंदर राहण्यासाठी नागरिकांनी फक्त आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवला तरीही संपुर्ण शहर स्वच्छ राहणार आहे, असे ते म्हणाले.


स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेत विनायकनगर परिसरात स्वच्छता अभियान राबविताना कै. एस. पी. देशपांडे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य. समवेत नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, उपायुक्त सुनील पवार, शशिकांत नजान, किशोर देशमुख आदी. (छाया- लहू दळवी, नगर)

Post a Comment

0 Comments