Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रस्तालुटीतील चारजण जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - रस्ता लुटीतील चार चोरट्यांना पोलिसांनी पकडले. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अक्षय रजनीकांत मकासरे (वय २३), तुषार बाबासाहेब निपुंगे (वय २४), सागर एकनाथ वंजारे (वय ३०), राहुल मच्छिंद्र साळवे (वय २६) असे पकडलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.२१ जानेवारीला भानसहिवरा येथून बचत गटाची कर्जाची रक्कम २००,७८५ रुपये बँकेत जमा करण्यासाठी जात असताना, दुचाकीवर भानसहिवराकडून येऊन चाकूचा धाक दाखवून पैशाची बँग बळजबरीने हिसकावून चोरून नेली, अशी फिर्याद किरण आण्णासाहेब जाधव यांनी नेवासा पोलिस ठाण्यात दिली होती. सदर घटनाही अक्षय रजनीकांत मकासरे (रा.भानसहिवरा ता.नेवासा) यानी त्याच्या साथीदारासह केला आहे. तो साखरवाडी ता.फलटण जि.सातारा येथे ऊसतोड कामावर आहे, अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने साखरवाडी येथे जाऊन मोठ्या शताफीने मकासरे याला ताब्यात घेतला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, गुन्हा हा मी व तुषार बाबासाहेब निपुंगे , सागर एकनाथ वंजारे , राहुल मच्छिंद्र साळवे (सर्व रा.भानसहिवरा ता.नेवासा) असे आम्ही निपुंगे याची बिगर नंबरची नवीन प्लटिन दुचाकी वरून येऊन केल्याची कबुली दिली. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, चोरलेली रक्कम आपआपसात वाटून घेऊन, सदर पैशांचे तीन नवीन मोबाईल घेतल्याचे सांगितले. त्याच्या कडून १५ हजार रुपये रोख रक्कम, ३१ हजार रुपयांचे मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली ४० हजार रुपयांची दुचाकी असा एकूण ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई पोना.संदीप कर्डीले, रविकिरण सोनटक्के, सचिन आडबल, संतोष लोढे, राहुल साळुंके, सागर सासणे, मयुर गायकवाड, दीपक शिंदे, चापोहेकाँ संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments