Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलीस दलातर्फे आयोजित निबंध (मराठी माध्यम) स्पर्धेचा निकाल जाहीरआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - पोलीसांबाबत सर्व सामान्य जनतेमध्ये संवेदनशीलता निर्माण व्हावी, आणि पोलीस व विद्यार्थी मध्ये जवळकी वाढावी, या हेतूने पोलीस स्थापन दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या शहरस्तरीय निबंध (मराठी माध्यम) स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे.
निबंध (मराठी माध्यम) स्पर्धेत शालीय गटात प्रथम - अक्षय आण्णासाहेब बडे (रुपीबाई मोतीलाल बोरा, न्यू इग्लिंश स्कूल), द्वितीय - जुई श्रीकांत शेलार (प्रगत माध्य. व उच्च मा.विद्यालय), ततीश - पठाण आलिशा नासीर (यशवंत माध्यमिक विद्यालय).
खुला गटात - प्रथम - प्रा.डॉ. गोंविद कदम (भोग्यादय माध्य.व उच्च मा.विद्यालय, केडगाव), द्वितीय - सौ.खडके विद्या समीर (वि.ल.कुलकर्णी प्रा.शाळा), ततीय - सौ.स्नेहल छाजेड (अहमदनगर), उत्तेजनार्थ - मपोको दिपाली दिलीप भालेराव (उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, नगर विभाग, अहमदनगर), सोमनाथ कराश्या भोसले ( अहमदनगर कारगह) या सर्व विजयी विद्यार्थ्यांचे प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके आदिसह अन्य अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
या निबंध स्पर्धेसाठी नगर शहरातील शाळा, काँलेजमधील ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Post a Comment

0 Comments