Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हा नियोजन बैठकीत जलशिवार योजना, चारा छावणी आणि पाणी टँकर घोटाळ्याची चौकशीची आमदार रोहित पवाराची मागणी


नगर जिल्ह्यासाठी सन २०२०-२१ या वर्षाच्या ५७१ कोटीच्या विकास आराखडाला मंजुरी - पालकमंत्री मुश्रिफ
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्ह्यात जलशिवार योजना, चारा छावण्यात आणि पाणी टँकर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी आमदार रोहित पवार यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत केली. या मागणीचा ठराव करून तो राज्य शासनाच्या बैठकीत मांडण्यात येईल, असे पत्रकार परिषदेत पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी सूचित करत ते पुढे म्हणाले की, जिल्हा विभाजनाबाबत महसूलमंत्र्यांना विचार असे म्हणून जिल्हा विभाजनाचा विषय महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्यावर ढकलून दिला. नगर जिल्ह्यासाठी सन २०२०-२१ या वर्षाच्या ५७१ कोटीच्या विकास आराखडाला मंजुरी देण्यात आली आहे, असे सांगितले.
यावेळी राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे, आमदार रोहित पवार, निलेश लंके, संग्राम जगताप, आशुतोष काळे, बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आदि उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रिफ पुढे म्हणाले की, राज्यात विकासात अहमदनगर जिल्हा १नंबर मध्ये आणण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी काम करावेत. बैठकीत रस्ते, विजेवर चर्चा झाली. मागील वर्षाचा ७० टक्के निधी अखर्चित राहिला आहे, त्यासाठी पुर्ननियोजन केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा घुले यांनी जिल्ह्यात १००० प्रा.शाळा खोल्यांची आवश्यकता असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानुषंगाने ३ वर्षात नवीन खोल्या व खोल्या नव्यानं दुरुस्ती करण्यात येतील. यासाठी साई संस्थानकडून व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून २० टक्के निधी हा शिक्षणावर खर्च केला जाणार आहे. सर्वसाधारण योजना ३८१.३९ कोटा रुपये, आदिवासी उपयोजन ४६.०१, अनुसूचित जाती उपयोजना १४०.४५ असा एकूण ५७१.८० कोटी रुपयांचा निधीस मंजुरी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील श्री सुद्रीकेश्वर महाराज देवस्थान, पारगाव सुद्रीक, (श्रीगोंदा) श्रीराम देवस्थान, कौठा (श्रीगोंदा), श्री गणेश मंदिर ट्रस्ट, पोहेगाव कोपरगाव या ग्रामीण तीर्थक्षेत्रांना क वर्ग मान्यता देण्यात आली.

Post a Comment

0 Comments