Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर एमआयडीसीत सुपरवायझरचा खूनआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - एमआयडीसीतील क्राँम्प्टन सिक्युरिटीगार्डने सुपारवायझरवर कोयत्याने वार करून खून झाल्याची घटना (दि.२३) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. राजाराम नामदेव वाघमारे ( वय ४८, रा.भिंगार) असे खून झालेल्याचे नाव आहे. 
सिक्युरिटीगार्ड किरण रामभाऊ लोमटे (रा.देवळली प्रवरा, ता.राहुरी) याने ऊसतोडणीच्या कोयत्याने मयत वाघमारे यांच्यावर वार करून खून केला. सकाळी वाघमारे हा कामावर होता.यावेळी सुपरवायझर वाघमारे यांनी लोमटे यास कामाची सूचना दिली. यानंतर लोमटे हा कंपनीच्या बाहेर जाऊन कोयता आणला. दरम्यान लोमटे याने सुपरवायझर वाघमारे यांच्या वर कोयत्याने वार केले. या घटनेत वाघमारे गंभीर जखमी झाल्याने ते जागीच मयत झाल्याची प्राथमिक माहिती समजते.

Post a Comment

0 Comments