Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोतवाली पोलीस ठाण्याचे चार कर्मचारी निलंबितआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - कोतवाली पोलीस ठाण्याचे चार कर्मचाऱ्यांवर प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी गुरुवारी (दि.१६) निलंबनाची कारवाई केली. यात प्रभाकर भांबरकर, राहुल खरात, कुशल जाधव,किरण बारावकर अशी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
समजलेली माहिती अशी की, वाळू प्रकरणात पकडलेले गाड्या सोडून देणे आणि बंदोबस्तात असणारा आरोपी पळून जाणे आदि गंभीर दोन घटनांमध्ये हलगर्जीपणा करण्यात आल्याचा ठपका निलंबित कोतवाली पोलीस ठाण्याचे चार पोलिस कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला. या कारणास्तव प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी पोलीस कर्मचारी प्रभाकर भांबरकर, राहुल खरात,कुशल जाधव,किरण बारावकर यांना निलंबित केले असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments