Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हा रुग्णालयाच्या वतीने "जनजागृतीतून जनआरोग्याकडे" व्याख्यानमाला उत्साहात


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत त्याचे हृदय अविरत कार्य करत असते. या अवयवाला चांगल्या प्रकारे ऑक्सिजन आणि पोषण घटक मिळावेत यासाठी शुद्ध रक्त रोहिण्या काम करत असतात ज्या ठिकाणी सर्वात जास्त तणाव निर्माण होतो तेथे काही अडथळे निर्माण होतात. कधी ते गुणसुत्रांमुळे होतात तर कधी बदलत्या जीवन शैलीमुळे होतात. मात्र हल्ली तारूण्यातच हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे प्रतिपादन डॉ. सुहास हरदास यांनी केले.
     सहकार सभागृह येथे जिल्हा रूग्णालयाच्या वतीने "जनजागृतीतून जनआरोग्याकडे" व्याख्यानमाला या  कार्यक्रमात आरोग्य प्रबोधनपर व्याख्यान मालेत ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात जिल्हा पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्या हस्ते धन्वंतरी पुजन आणि दिप प्रज्ज्वलनाने करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदिप सांगळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बापुसाहेब गाढे, मधुमेहतज्ञ डॉ. शैलजा काळे, आहारतज्ञ डॉ. शिल्पा जोशी, मोसमी ठाकर, अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दर्शना बारवकर, डॉ. आशिष कोकरे, हृदयरोगतज्ञ डॉ. धनंजय वारे, डॉ. सुरेश घोलप आदि उपस्थित होते.
     बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग होण्याच्या वयोमर्यादा अगदी कमी म्हणजे तारूण्यातच हृदयविकाराचे झटके येण्यात झाले आहे. हल्ली फास्ट फुडचा जमाना आहे त्यामुळे लोकांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आपला आहार हा उलट्या पिरॅमिड सारखा असावा म्हणजेच नाष्टा राजस असावा. दुपारचे जेवण त्यापेक्षा कमी असावे. तर रात्रीचा आहार अगदी कमी असावा.
     सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिडस् यांचे प्रमाण संतुलित असावे. तेलाचा वापर करताना मोनो अनसॅच्युअर्ड फॅटी अ‍ॅसिड आणि फॉली अनसॅच्युअर्ड फॅटी अ‍ॅसिड यांचे प्रमाण एकास एक असे वापरावे. दुर्दैवाने आपण, उद्या कोणता आहार घेणार याचे नियोजन करत नाही हा बदलत्या शैलीचा मोठा दुष्परिणाम आहे.
     भारतातील मधुमेहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आहे. २०३० सालापर्यंत ते वाढतच राहिल म्हणून आपल्या देशातील अधिकाधिक अर्थस्त्रोत रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेह नियंत्रित करण्यावर वापरले जातात. देशातील आरोग्य प्रणाली उत्तम आहे मात्र आपल्याच चुकीच्या लाईफस्टाईलमुळे या रोगांना आमंत्रण मिळते. असे मत मधुमेहतज्ञ डॉ. शैलजा काळे यांनी व्यक्त केले. आपल्याकडे छोट्या छोट्या गावांचे देखील शहरीकरण होत असल्याने डायबेटीस, रक्तदाब आणि हृदयरोग हे छोट्या छोट्या शहरातुनही बळावलेले दिसतात. प्रदूषण, व्यायामाचा अभाव यामुळे आणि मुख्य म्हणजे फास्टफुड मुळे या रोगांवर नियंत्रण आणणे कठिण जात आहे. फास्टफुडची जागा सात्विक आहाराकडे वळविणे हाच यावर उपाय आहे.
     यावेळी उपस्थित श्रोत्यांचा डॉक्टरांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातुन संवाद घडविण्यात आला. हृदयरोग तज्ञ डॉ. सुहास हरदास, मधुमेह तज्ञ डॉ. शैलजा काळे, आहार तज्ञ डॉ. शिल्पा जोशी, मोसमी ठाकर यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी तज्ञ डॉक्टरांना सन्मानपत्रे देवुन गौरविण्यात
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धनंजय वारे यांनी केले तर आभार प्रदर्शन मधुमेहतज्ञ डॉ. भरत साळवे यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधीकारी डॉ. मनोज घुगे, डॉ. अरूण सोनवणे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षल पठारे, गोरक्ष इंगोले, गणेश शिंदे, सतिश अहिरे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments