Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हिंदी अध्यापक संघाच्या पुणे विभागीय कार्याध्यक्षपदी प्रा. सुभाष चिंधे
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - शहरातील शिशूसंगोपन संस्थेच्या महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.सुभाष चिंधे यांची राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी प्राध्यापक संघाच्या पुणे विभागाच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. संघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी ही निवड केली आहे. प्रा.चिंधे हे गेल्या १७ वर्षापासून प्राध्यापक अध्यापनाचे काम करत आहेत. हिंदी अध्यापक संघाच्या पुणे विभागाचे समन्वयक म्हणून त्यांनी काम केले आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हा विषय सक्तीचा करण्यात यावा, यासाठी आपण शासनदरबारी लढा उभारणार असल्याचे चिंधे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments