Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कुकाणा येथे ट्रक्टर खाली चिरडून एक ठार ; संतप्त ग्रामस्थांचा एक ते दीड तास रास्तारोको
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
कुकाणा - अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कूकाणा येथे उसाच्या ट्रक्टर खाली पडून एकजण जागीच ठार झाला. मयत झालेला १९ वर्षाचा तरुण असून त्याचे नाव रोहित अशोक पुंड असे होते. तो तरवडी ता.नेवासा येथील होता. तो मोटर सायकलवरून कुकाणा येथून घरी जात असताना अपघात झाला.

ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी दहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी कुकाणा येथे तब्बल एक ते दीड तास रास्तारोको आंदोलन केले.नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने तरवडी येथील रोहित अशोक पुंड या १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.शहरातील मुख्य रस्त्यावर हा अपघात झाला आहे.अपघातानंतर कुकाणा, तरवडी व परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत, कुकाणा येथील तरवडी चौकात नेवासा- शेवगाव राज्य मार्गावर रस्तारोको केला.यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे यांना निवेदन देण्यात आले. 
अपघातात मयत झालेल्या रोहित याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments