Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सानप यांच्या पाठपुरावाने नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणास मंजुरी


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग विकसित करावेत, याबाबत रस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता, त्यास यश आले आहे. सानप यांच्या पाठपुराव्याचे कौतुक करीत ना.गडकरी यांनी नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची माहिती घेऊन, त्याच्या रुंदीकरणास मंजुरी दिल्याची माहिती कुतरवाडी (ता.पाथर्डी) चे सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांनी नगर रिपोर्टर' शी बोलताना दिली.निवेदनात रुंदीकरणाच्या मंजुरीत नगर जिल्ह्यातील अहमदनगर ते बीड (कडा,अष्टी, जामखेड, पाटोदा फाटा मार्गे), अहमदनगर ते करमाळा (मिरजगाव मार्गे), गेवराई जि.अहमदनगर ते शहापूर जि.ठाणे ( अमरापूर, शेवगाव, नेवासा, संगमनेर, अकोले मार्गे), पैठण ते पंढरपूर (बोधेगाव, पाटोदा मार्गे), कल्याण ते विशाखापट्टणम (अहमदनगर, माजलगाव,नांदेड), अहमदनगर ते दौंड (श्रीगोंदा मार्गे), भालगाव ता.पाथर्डी जि.अ.नगर ते नवगण राजुरी ता.जि.बीड आणि प्रमुख राज्य मार्ग पुणे- औरंगाबाद (अहमदनगर मार्गे), अहमदनगर - धुळे (राहुरी, मनमाड, येवला मार्गे), अहमदनगर- बीड (डोईठाण, अंमळनेर मार्गे) या मार्गाची रुंदीकरण करून विकसित करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे सानप यांनी ना.गडकरी यांच्याकडे केली आहे.
निवेदनाची दखल घेत, सदर रस्त्यांच्या रुंदीकरणाचे आदेश भारत सरकार सडक विकास, सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयचे महानिदेशक यांना दिले आहेत. प्रमुख राज्यमार्ग अहमदनगर-बीड (डोईडाण, अंमळनेर मार्गे) या रस्त्याचे अंदाजे रुंदीकरण ३० ते ३५ फूट आहे. बाकी सर्व रस्त्यांचे अंदाजे रुंदीकरण ४० ते ५० फूट असून, दुरुस्तीकरण आहे, असे सानप यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments