Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यातील 9 तिर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जास मान्यता


पारनेर 9 तर पाथर्डी,कोपरगाव, नेवासा, नगर प्रत्येकी तिर्थक्षत्रांचा समावेश 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 9 तिर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जास मान्यता मिळाली आहे.  यापूर्वीच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पाथर्डी 1, कोपरगाव 1, पारनेर 5, नेवासा 1 व नगर 1  या तालुक्यातील तिर्थक्षेत्रांना क वर्गात घेण्यासंदर्भात मंजुरी दिली गेली आहे. याबाबतची माहिती तालुक्यातील गटविकास अधिकार्‍यांना पत्राद्वारे कळविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 जिल्हा नियोजन समितीची नोव्हेंबर महिन्यात दि.19 रोजी झालेल्या बैठकीत 5 तालुक्यातील 9 तिर्थक्षेत्राना क वर्गात समाविष्ठ करण्यास मंजुरी मिळाली आहे. यात पाथर्डी तालुक्यातील श्री. स्वंयभू महादेव संस्थान, माणिकदौंडी, कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र भैरवनाथ जोगेश्वर मंदिर, चांदेकसारे, पारनेर तालुक्यातील श्री.मळाई वडजाई देवस्थान, चिंचोली, श्री गणेश क्षेत्र, म्हस्केवाडी, श्री क्षेत्र खंडेश्वर देवस्थान ट्रस्ट, आपधूप, डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर देवस्थान, पारनेर, पिर शेख बहुद्दीन चिस्ती रहे. दर्गाह, दरोडी आदी तिर्थक्षेत्रांचा समावेश आहे. या तिर्थक्षेत्रांचा समावेश क वर्ग दर्जात व्हावा, यासाठी दि.8 ऑक्टोबरमध्ये जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव दाखल झाले होते. त्या प्रस्तावावर दि.19 नोव्हेंबर 2019ला जिल्हा नियोजनाची बैठक होऊन दाखल प्रस्तावास मंजुरी दिली गेली आहे. या तिर्थक्षेत्रांना क वर्गाच्या मान्यतानंतर याबाबत ज्या त्या तालुक्यातील गट विकास अधिकार्‍यांना त्याबाबत अधिकृत पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे. 

Post a Comment

0 Comments