Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सारसनगरात 9 ते 16 जानेवारी संत भगवानबाबा पुण्यतिथी द्वादस तपपूर्ती सोहळा

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - सारसनगर येथील भगवानबाबानगर या ठिकाणी संत भगवानबाबा पुण्यतिथी द्वादस तपपूर्ती सोहळा गुरुवार दि.9 ते 15 जानेवारी या नवीन वर्षोच्या कालावधीत आयोजित केला आहे.
सात दिवसाच्या तपपूर्ती सोहळ्याच्या कालावधीत दररोज पहाटे 4 ते 6 काकडा सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते 4 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 4 ते 5 प्रवचन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, 9 ते 11 यावेळेत कीर्तन व नंतर हरिजागर कार्यक्रम आहेत. या कालावधीत गुरुवार (दि.9) अमोल महाराज जाधव, शुक्रवार (दि.10) मनकर्णाताई काळे, शनिवार (दि.11) 1008 महामंडलेश्वर त्रिविक्रमानंदशास्त्री, रविवार (दि.12) शिवानंदजी शास्त्रीजी, सोमवार (दि.13) महंत रामकृष्ण महाराज शास्त्री, मंगळवार (दि.14) भरत महाराज जोगी, बुधवार (दि.15) रामगिरी महाराज आदिंची आणि गुरुवार (दि.16) महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप होणार आहे. या संत भगवानबाबा पुण्यतिथी द्वादस तपपूर्ती सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत भगवानबाबा सेवाभावी प्रतिष्ठान व भक्त मंडळ पंचक्रोशीतून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments