Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगरमध्ये 9 ते 13 जानेवारी दरम्यान साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा 2020 जिल्हास्तरीय प्रदर्शनआँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर : नगरमध्ये दि.9 ते 13जानेवारी 2020 दरम्यान साईज्योती स्वयंहाय्यता यात्रा 2020 या जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणारे हे प्रदर्शन गुलमोहोर रोडवरील पारिजात चौकातील तांबटकर मळा मैदानावर होणार आहे. या प्रदर्शनात अहमदनगर जिल्ह्यातील 300 स्वयंसहाय्यता समूहांच्या 600 महिला स्वरोजगारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती जि.प.अध्यक्षा राजश्री घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रदर्शनाचे
नगरमध्ये याआधी झालेल्या सर्व प्रदर्शनांना मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या हेतूने महाराष्ट्र शासनाने सन 2010 पासून हा उपक्रम सुरू केला आहे. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या स्वयंसहाय्यता समूहांच्या सदस्यांना विविध उत्पादनांचे मार्केटिंग कौशल्य शिकण्यास मदत झाली आहे. जिल्हास्तरीय व विभागस्तरीय प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिला राज्यस्तरीय प्रदर्शनात हजेरी लावून आलेल्या आहेत.
या प्रदर्शनात सहभागी होणारे स्वयंसहाय्यता समूह गृहपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, लोकरीची उत्पादने, मसोल, सेंद्रिय उत्पादने, कडधान्य, लाकडी वस्तू, बांबूच्या कलाकृती, दुग्धजन्य पदार्थ, वनौषधी, हस्तकला वस्तू, बांबूशिल्प, खेळणी, ज्वेलरी अशा अनेक वस्तूंचे स्टॉल लावणार आहेत. याशिवाय विविध खाद्यपदार्थांचीही रेलचेल असणार आहे. याशिवाय प्रदर्शन कालावधीत दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात सहभागी होणार्‍या बचत गटांच्या महिलांच्या निवासाची व्यवस्था नगर शहरातील नजीकच्या मंगल कार्यालयांमध्ये करण्यात आली आहे. त्यांना निवासाच्या ठिकाणाहून प्रदर्शनस्थळी ने आण करण्यासाठीही वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. प्रदर्शन स्थळी सुरक्षा उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. सदर जिल्हास्तरीय प्रदर्शनात सहभागी होणार्‍या महिला सदस्यांचा तसेच त्यांच्या उत्पादनांचा विमा उतरविण्यात आला आहे. प्रदर्शनात सहभागी बचत गटांना दररोजच्या विक्रीतून जमा होणारे पैसे त्यांच्या स्वयंसहाय्यता गटाच्या खात्यावर जमा करता यावे यासाठी यासाठी बँकींग बिझनेस करस्पॉडंटमार्फत सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय संपूर्ण प्रदर्शनाच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
फोटो-साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रेचे मंडप भूमिपूजन करताना अध्यक्षा राजश्री घुले,उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके , सभापती उमेश परहर, , प्रकल्प संचालक परिक्षित यादव ,किरण साळवे सोमनाथ रोकडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments