Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगार छावणी परिषद हद्दीतील अपंगांना घरपट्टी व पाणीपट्टीत 50 टक्के सवलत द्या ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - शासन निर्णयानुसार पुणे छावणी परिषदेच्या धर्तीवर भिंगार छावणी परिषद हद्दीतील अपंगांना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये 50 टक्के सवलत द्यावी व व्यवसायासाठी बाजार तळ येथे अधिकृत टपरीची व्यवस्था करुन देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने छावणी परिषदेचे कार्यालयीन अधिकारी स्नेहा पारनाईक यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी युवकचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद, अपंग युवक अश्फाक शेख, सय्यद मुजाहिद, अमान शेख, तजमुल शेख, आवेज शेख, शाकीर शेख, असिफ अत्तार, नवेद शेख, शहेबाज शेख, कलीम शेख, मोईज शेख, साजिद सय्यद, आसिफ अत्तार आदींसह अपंग बांधव उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या सन 2001 मध्ये अस्तित्वात आलेल्या अपंग कल्याण कृती आराखडा मध्ये रोजगार व स्वयंरोजगार विषयी उपाययोजनेच्या तरतुदी नुसार स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय योजना केंद्र, शासनाच्या योजना, दारिद्रय निर्मूलन योजना याअंतर्गत किमान 3 टक्के निधी अपंग व्यक्तींच्या कल्याण व पुनर्वसनकरिता राखून ठेवण्याबाबतचे निर्देश दिले आहे. या अनुषंगाने दि.29 जुलै 2015 रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपंग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 3 टक्के निधी मधुन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी सामुहिक तथा वैयक्तिक लाभाच्या कोणत्या योजना राबवावे याबाबत शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश दिलेले आहेत. पुणे छावणी परिषदेने अपंग बांधवांना घरपट्टी व पाणीपट्टी मध्ये 50% सवलत दिलेली आहे. अहमदनगर येथील भिंगार छावणी परिषद मध्ये आजपर्यंत अपंगांना कोणत्याही प्रकारची सवलती देण्यात आलेली नाही. तरी शासन निर्णयानुसार घरपट्टी व पाणीपट्टी मध्ये 50 टक्के सवलत देण्यात यावी. तसेच शासनाच्या निर्णयाप्रमाणे भिंगार बाजार तळ येथे अपंगांना उदरनिर्वाह व व्यवसायासाठी अधिकृतपणे टपरीची व्यवस्था करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे.     

Post a Comment

0 Comments