Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हा नियोजन समिती निवडणूक - शिवसेना राष्ट्रवादीत निवडणूक झाल्याने महाआघाडीत बिघडी


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः जिल्हा नियोजन समितीच्या महापालिकेच्या दोन जागांसाठी मंगळवारी (दि.24)  जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जिल्हा सैनिक लॉनमध्ये मतदान झाले. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे व अमोल येवले या दोन्ही शिवसैनिकांत तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नगरसेवक विनित पाऊलबुद्धे व शिवसेनेच्या सुवर्णा जाधव यांच्या लढत झाली. शिवसेनेचे अनिल शिंदे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे विनित पाऊलबुद्धे यांचे पारडे जड असल्याची चर्चा यावेळी होती. यापूर्वी भाजपाच्या नगरसेविका आशाताई कराळे या बिनविरोध झाल्या आहेत. परंतु शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत ही सरळसरळ लढत झाल्याने महाआघाडीत बिघडी झाली असल्याचीही मतदान केंद्राबाहेर चर्चा सुरु होती.  
  यावेळी शिवसेनेचे 23 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे 19 नगरसेवक, भाजपाचे 14 नगरसेवक, बहुजन समाज पार्टीचे 4 नगरसेवक, काँग्रेसचे 5 नगरसेवक अपक्ष 1 नगरसेवक आणि समाजवादी पक्षाचे 1 नगरसेवक अशा एकूण 67 मतदारांनी मतदानाचा हक्का यावेळी बाजवला. परंतु राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षाचे सरकार सत्तेवर आहे. असे असताना नियोजन समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सारिका जाधव यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नगरसेवक विनित पाऊलबुद्धे उभे ठाकल्याने ही निवडणूक म्हणजे महाआघाडीत बिघडी आहे, असाच सूर उमटला. शिवसेनेत मतभेद झाल्याने त्यांचा फायदा दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांपैकी कोण जास्त मते घेऊन विजयी होतो, याबाबत मंथन सुरु होते.   
मोठे नागरी निर्वाचन क्षेत्रातून (महापालिका) सर्वसाधारण प्रवर्गातून एक व नागरिकांचा मागास या प्रवर्गातून एक, असे दोनजण जिल्हा नियोजन समितीवर पाठविण्यासाठी ही निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत मतदान केंद्रावर महापालिकेच्या 67 नगरसेवकाांनी मतदान हक्क बजावला. यावेळी नगरसेवकांना मतदान करताना ओळखपत्राचा पुरावा म्हणून स्थानिक स्वराज्य ंसंस्थेच्या सक्षम प्राधिकार्‍याने दिलेले छायाचित्र ओळखपत्र ग्राह्य धरण्यात आले. यावेळी शहर शिवसेनेमध्ये मतभेद झाले असल्याने यात दोन्ही उमेेवारांमध्ये नेमके कुणाचे परडे जड आहे, याविषयावर दबक्या आवाजात सूर उमटले. राष्ट्रवादी व भाजपाची छुपी युती असल्याचेही यावेळी बोलले जात असल्याने राष्ट्रवादीचे विनित पाऊलबुद्धे यांचे पारडे जड असल्याची सांगण्यात येते होते. 
 या निवडणुकीत अपर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अजय मोरे यांनी सहकार्य केले. निवडणूक विभागाचे तहसीलदार चंद्रशेखर शितोळे हे केेंद्राध्यक्ष, तर नायब तहसिलदार निलेश पाटील, महापालिकेचे नगरसचिव एस.बी.तडवी, महसूल विभागाचे अव्वल कारकून अनिल गुगळे, विजयकुमार धोत्रे व भाऊसाहेब वाघ यांनी काम पाहिले.
सर्वसाधारण जागेसाठी १ जागा तर नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी १ जागा अश्या २ जागेसाठी महासैनिक लॉन येथे आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असुन २ जागेसाठी ४ उमेदवार निवडणुक रींगणात होते.
६८ नगरसेवकांपैकी सारीका भुतकर यांचे नगरसेवकपद जात पडताळणी दाखला सादर न केल्याने रद्द झाले होते त्यामुळे ६८ पैकी ६७ नगरसेवक मतदार यादीत होते या सर्वांनी मतदान केल्याने १०० टक्के मतदान पार पडले.
२६ डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे

Post a Comment

0 Comments