Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगरातील एका उद्योगपतीवर अट्रोसिटी गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - शहरातील एका बड्या उद्योगपतीवर अट्रोसिटीचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.७) रात्री उशिराने दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर शहरातील त्या बड्या उद्योगपतीकडे  नगर तालुक्यातील शेंडी (पोखर्डी) येथे असणाऱ्या शेती राखणीसाठी व अन्य पडेल त्या कामासाठी प्रत्येकी पारधी कुटुंबाना १० हजार रुपये तोंडी देणे ठरले होते. हे काम गेल्या १० वर्षापासून ते कुटुंब करत आले आहेत. ती १० वर्षाची राहिलेली रक्कम द्यावी म्हणून सदर उद्योगपतीकडे वारंवार महिलांनी मागणी केली. गुरुवारी दि.५ डिसेंबर ला १० वर्षाची कामाचे पैसे मागण्यासाठी उद्योगपतीच्या पोखर्डी येथील बंगाल्यावर महिला गेलो असता, त्यांनी शिवीगाळ केली व तेथे अन्य ३ अनोळखींनी  आम्हा सर्व महिलांना लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यात एका अन ओळखी माणसाने फायबरच्या दांडक्याने मांडी, हाताला व कमरेला मारहाण करून दुखापत केली. यावेळी जवळ असणाऱ्या बाळाला मार लागला आहे. यानंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालो. उपचार घेतल्यानंतर शनिवारी  रुग्णालयातूूून सोडण्यात आले, यानंतर  एमआयडीसी पोलिस ठाण्यात सुमारे साडेपाच तास ताटकळत रात्री उशिरापर्यंत बसलेल्या महिलेने  दिलेल्या फिर्यादीवरुन कलम १८६० नुसार १४३,१४७, ३२४, ३२३, ५०४, ५०६ , अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ नुसार ३(१) (s), ३(१)(r), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार ३७(१)(३), १३५ अन्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****************

एमआयडीसी पोलिस ठाण्यात अन्याय झालेल्या महिला फिर्याद देण्यासाठी साडेपाच तास ताटकळल्या..
विशेषतः या घटनेमध्ये मागास पारधी समाजातील महिलांना लहान बाळासह एका अल्पवयीन मुलीला मारहाण झाली. जिल्हा रुग्णालयातून उपचार घेऊन शनिवारी (दि.७) दुपारी सोडण्यात आले. यानंतर सायंकाळी ४.३५ वा. एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्या पारधी समाजाच्या महिला फिर्याद देण्यासाठी गेल्या असता, पोलिसांनी त्या महिलांना रात्रीच्या १०.३० वाजेपर्यंत लहान मुलांसह पोलीस ठाण्यात ताटकळत बसविण्यात आले. या दरम्यान ८ वाजेपर्यंत असणाऱ्या ठाणे अंमलदार गायकवाड यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करुन फिर्याद घेतली. परंतु काही वेळेनंतर प्रथम ठाणे अंमलदार याची सुटी झाली. त्या ठिकाणी नव्यानं कामावर हजर झालेल्या ठाणे अमंलदाराने फिर्याद द्या. उद्या या आणि फिर्याद काँफी घेऊन जा. असे उत्तर त्या अन्याय झालेल्या महिलांना सांगितले. यानंतर काही वेळेनंतर त्या मारहाण झालेल्या महिलांची फिर्याद घेण्यात आली. 

Post a Comment

0 Comments