Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगार प्रश्‍नी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली ब्रिगेडियर राणा यांची भेट



आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - भिंगारच्या विविध नागरी प्रश्‍नासंदर्भात भिंगार राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर विजयसिंग राणा यांची भेट घेऊन त्यांच्या समोर समस्यांचा पाढा वाचण्यात आला. हे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, गॅरिसन इंजिनियर नॉर्थपारस मायशेरी यांच्याशी देखील चर्चा करुन निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, कलीम शेख, मीना मेहतानी, सुरेश मेहतानी, संभाजीराव भिंगारदिवे, नाथाजी राऊत, रमेश वराडे, अभिजीत सपकाळ, मच्छिंद्र बेरड, विलास तोडमल, केशव रासकर, मतीन सय्यद, विशाल बेलपवार, राधेलाल नकवाल, सुदाम गोंधळे, मतीन ठाकरे, दीपक लिपाने, संजय खताडे, सिद्धार्थ आढाव, मुसद्दीक सय्यद, शिवम भंडारी, नवनाथ मोरे, सिध्दूतात्या बेरड, अजिंक्य भिंगारदिवे, पापा सारसर, अक्षय भिंगारदिवे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भिंगार छावणी परिषद हद्दीतील विकास कामांचा मोठा अनुशेष शिल्लक आहे. या ठिकाणी काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. केंद्र शासनाने यापूर्वीच देशातील सर्व छावणी मंडळांना क वर्ग नगरपालिकेचा दर्जा बहाल केला आहे. जेणेकरून छावणी क्षेत्रात त्या राज्यातील राज्य शासनाच्या अंतर्गत विविध योजना राबविणे श्रेयस्कर होईल. पण अद्यापर्यंत छावणी मंडळाकडून याबाबत मान्यता व केंद्रीय संरक्षण खात्याची परवानगी घेण्यात आलेली नाही. याबाबत पाठपुरावा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागातील राहणारे नागरिक राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पासून आजपर्यंत वंचित असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 छावणी परिषद हद्दीतील नागरिकांना सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पाठपुरावा होणे आवश्यक आहे. तसेच या माध्यमातून छावणी परिषद परिसरात मूलभूत सोयीसुविधा राबवणे सोयीस्कर होईल. तसेच भिंगार छावणी मंडळ परिसरात पाणी प्रश्‍न अत्यंत अडचणीचे ठरत आहे. या अनुषंगाने भिंगार छावणी मंडळ परिसरातील नागरिक क्षेत्रासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची गरज आहे. तसेच भिंगार छावणी मंडळ हॉस्पिटल येथे डॉक्टर व कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याने याठिकाणी रुग्णांना उपचार घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच योग्य पद्धतीने उपचार होत नसल्याचेही उघडकीस आले आहे. या हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर व कर्मचारी वर्गाची संख्या वाढविणे,  भगवान गौतम बुद्ध जॉगिंग ट्रॅक येथे योगासाठी ओटा व ट्रॅक सुधारणा करण्यात यावी, अंडर एमईएस छावणी परिषदेचे ब्रिगेडियर यांच्या माध्यमाने डीएसपी चौक ते बेलेश्‍वर चौक, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल ते पंचशील चौक, कॅन्टोन्मेंट ऑफिस ते भिंगार नाला इराणी रोड या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  

Post a Comment

0 Comments