Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर शहरात खुलेआम प्लॅस्टिक विक्री करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कारवाईआँनलाईन न्यूज पोर्टल
नगर रिपोर्टर
अहमदनगर : शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक वापरावर बंदी असतांनाही अहमदनगर शहरात खुलेआम प्लॅस्टिक विक्री व प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिकेची धुरा हाती घेतल्यानंतर विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपाकडून कठोर अंमलबजावणीला सुरूवात झाली असून, गुरुवारी (दि.5) दिवसभरात तब्बल एक लाखापर्यंत दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, मनपाच्या आक्रमक कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

स्वच्छता सर्वेक्षणाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी बुधवारी (दि.5) बैठक घेतली. यात प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करुन स्वच्छता निरीक्षकांना कारवाई सुरू करण्याची तंबी दिली होती. प्रत्येक स्वच्छता निरीक्षकाला उद्दिष्टही देण्यात आले आहे. त्यानुसार मनपाच्या पथकांकडून शहरात तपासणीसाठी छापे मारण्यास सुरूवात झाली आहे. दिवसभरात प्लॅस्टिक वापरणार्‍यांवर धडक कारवाई करुन 91 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकही जप्त करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या आदेशानुसार व उपायुक्त सुनील पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. अनिल बोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक राजेंद्र सामल, के. के. देशमुख, आर. एल. सारसर, पी. एस. बीडकर, ए. व्ही. हंस, एस. ई. वाघ, बाळासाहेब विधाते, टी. एन. भांगरे आदींनी ही कारवाई केली. दुपारनंतरही पथकांकडून शहरात तपासणी सुरू होती.

Post a Comment

0 Comments