Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांची माळवाडगांवला भेट


पंचायत समितीच्या माध्यमातून येणाऱ्या योजना शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार ; गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
माळवाडगाव -  श्रीरामपूर पंचायत समिती येथे नव्यानेच नियुक्त झालेले श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री जालिंदर आभाळे व विस्तार अधिकारी विजय चराटे यांनी काल दि.४ डिसेंबर रोजी माळवाडगांव ग्रामपंचायतीला अचानक भेट देऊन गावाची पाहणी केली. 
      श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगांव येथे काल श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी काल माळवाडगांव ग्रामपंचायतीला अचानक भेट देऊन गावातील अंतर्गत रस्ते,स्वच्छता आणि गावातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जिर्ण झालेल्या इमारतींची पाहणी केली.तसेच जिल्हा परिषद शाळेला देखील भेट देऊन तेथील अडचणी समजावून घेतल्या आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळालेल्या नाविन्यपूर्ण प्रयोग केंद्राला देखील भेट दिली.यावेळी त्यांच्यासमवेत माळवाडगांवचे प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री बाबासाहेब पा चिडे,श्रीरामपूर बाजार समितीचे माजी संचालक श्री गिरीधर पा आसने,ग्रामसेविका सौ प्रियंका शिंदे,नानासाहेब आसने,ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब काळे,बबन आसने,सतिश आसने,दिलीपराव हुरुळे,गोकुळ ञिभुवन,विठ्ठलराव कावरे,मच्छिंद्र गाढे,संजय बाबर यासह आदि यावेळी उपस्थित होते. 
         त्यावेळी ग्रामसेविका सौ प्रियंका शिंदे यांनी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना गावातील चालू व काही प्रस्तावित असलेल्या विकास कामे तसेच घरकुल योजनांसाठी येत असलेल्या अडचणी सांगितल्या.
      यावेळी गटविकास अधिकारी आभाळे यांनी सांगितले की,मी गटविकास अधिकारी असल्याने सर्व योजना पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात प्रभावी राबवुन सर्व योजनांची माहिती सर्व ग्रामपंचायतींना देऊन त्या योजना राबविण्यासंबंधी प्रत्येक ग्रामविकास अधिकारी यांना सुचना देत आहे जेणेकरून प्रत्येक गावात योग्य प्रकारे विकास कामे होतील याची दक्षता घेत आहेत.तसेच संपुर्ण योजना राबवुन शंभर टक्के यशस्वी करण्याचे आदेश देखील सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
       गटविकास अधिकारी यांनी माळवाडगांवला भेट देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल माळवाडगांवचे सरपंच बाबासाहेब पा चिडे यांनी त्यांचे आभार मानले तसेच गावाच्या विकासासाठी आवश्यक ती मदत करण्याची मागणी देखील त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे तसेच गावचा विकास करण्यास कटिबद्ध असल्याचे देखील त्यांनी आपल्या मनोगतातुन सांगितले.

Post a Comment

0 Comments