Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल शिंदे यांना पोलिसांकडून मारहाण केल्याच्या निषेधार्थ जिल्हा पोलीस उपअधीक्षक सोनवणे व आमदार रोहित पवार यांना निवेदनआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ
अहमदनगर :- ज्येष्ठ पत्रकार व दै.राज आनंद न्यूज पेपरचे संपादक विठ्ठल शिंदे यांना तोफखाना पोलिस ठाण्याचे सब इन्स्पेक्टर पिंगळे, पोलिस कर्मचारी आव्हाड व होमगार्ड यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे व आमदार रोहित पवार यांना हल्ला विरोधी कती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी समितीचे जिल्हा निमंत्रक मन्सूरभाई शेख, ज्येष्ठ पत्रकार दीपक अतितकर, दीपक मेढे, प्रा.सुभाष चिंधे, विठ्ठल शिंदे व प्रकाश साळवे, बाबा ढाकणे, सिद्धीनाथ मेटे, अन्सार सय्यद, मोहसीन अहमद, आमीर सय्यद, दीपक कासवा, सुभाष मुदळ, निलेश आगरकर, शब्बीर शेख आदिसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments