आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - दिल्ली येथे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग मंडळाचे अधिकारी आशिष शर्मा यांच्याशी अहमदनगर येथील उड्डाणपुलाच्या कामाबद्दल चर्चा केली.
संरक्षण विभागाच्या हाती असलेल्या जमिनीच्या भूसंपादनासाठी नितीन गडकरी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या समवेत चर्चा सत्र आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नगर शिर्डी ( महामार्ग क्र. १६० ) हा राष्ट्रीय महामार्ग आहे, त्या परिस्थितीमध्ये विकसित करावा. त्या कार्यास प्रथम प्राधान्य देऊन लवकरात लवकर ते काम पूर्ण करावे, जेणेकरून शिर्डी -अहमदनगर महामार्गाची झालेली दयनीय अवस्था कशी आहे, याबाबत खा.विखे यांनी गडकरी यांचे लक्ष वेधले. महामार्गावर भाविकांना समस्या उद्भवणार नाही, एवढे काम करा, असे निर्देश केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले आहेत.
0 Comments