Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चाकू भोसकून तरुणाचा खून ; निबंळक बायपासवरील घटनाऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः चाकूने भोसकून तरुणांचा खून झाल्याची घटना नगर तालुक्यातील निबंळक बायपास येथे सकाळी उघडकीस आली. या घटनेने तालुक्यात एकाच खळबळ उडली असून, या घटनेतील मयताचे नाव नवनाथ गोरख वलवे (रा.सारोळा कासार) असे आहे.
 याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील निबंळक बायपास येथे एका तरुणांचा खून झाल्याची घटना मंगळवार (दि.31) सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळाताच, घटनास्थळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहन बोरसे हे आपल्या पोलिस कर्मचार्‍यांसह दाखल झाले. या घटनेबाबत पो. नि. बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या घटनेची पाहणी करून पुढील तपास केला जात आहे. अद्याप, याबाबत कोणतीही माहिती समजली नसून, लवकरच या घटनेचा तपास करून आरोपी निष्पन्न होतील असे सांगितले.

Post a Comment

0 Comments