Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फराह खान, रविना टंडन, भारती सिंह यांच्यावर नगरमध्ये गुन्हा दाखल
आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - येथील रहिवासी सिसील इझाक भक्त वतीने बॅक बेंचर्स या कार्यक्रमात फराह खान, रविना टंडन, भारती सिंह यांनी ख्रिश्‍चन धर्मीयांच्या भावना दुखावल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ख्रिश्‍चन समाजाने केली होती मात्र आज नगरमध्ये सिसील इझाक भक्त (वय 39, नाकरी, लाईड कॉलनी,सावेडी,नगर ) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात त्या तिघांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, ख्रिश्‍चन धर्मीयांचा पवित्र ग्रंथ हा बायबल आहे. यामध्ये हालेलुया या शब्दाला अनन्य साधारण महत्त्व आहे. पवित्र धर्म शास्त्रात हालेलुया या शब्दाचा कोणताही अर्थ दिलेला नाही. वेगवेगळ्या भाषेचा पवित्र शास्त्र बायबल मध्ये हायलेलुया या शब्दचा हाच उच्चाराने निर्माणकत्या परमेश्‍वराची स्तुती करण्यासाठी सदरचा शब्दप्रयोग केलेला आहे. दि.25 डिसेंबर 2019 च्या बँक बेंचर्सच्या थेट प्रेक्षेपणामध्ये डायरेक्टर फराह खान (रा.सजंय प्लाझा, एबी नय्यर रोड, जुहू, नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत), कॉमेडियन भारती सिंह व रविना टंडन (रा.निपुल सोसायटी, टंडन हाऊस, जुहू,मुंबई, महाराष्ट्र, भारत) यांचा सहभाग होता. भारती सिंह व रविना टंडन यांना दुसर्‍या फेरेमध्ये स्पेलिंग टेस्ट म्हणून हालेलुया या शब्दाचे स्पेलिंग व त्याचा अर्थ विचारला असता तिने त्या शब्दाचा अपभ्रंश करुन अभिताभच्या नावाच्या शब्दचा अपभ्रंश केला सारखे त्याची नक्कम करुन हालेलुया या शब्दाची टिंगल टवाळी केली तर फराह खानने हालेलुयाचा शब्दाचा अर्थ भारती हिला विचारला असता तिने ये गाली है असे सांगितले. यातुन ख्रिश्‍चन समाजाच्या भावनरा दुखावल्याने फिर्यादीमध्ये सिसील इझाक भक्त (वय 39, नाकरी, लाईड कॉलनी,सावेडी,नगर ) यांनी म्हंटले आहे.

Post a Comment

0 Comments