Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आठवडे बाजारातून मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद


स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः राहाता तालुक्यातील लोणी येथील आठवडे बाजारातून मोबाईल चोरीप्रकरणी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सचिन नेमजी काळे (वय 36), हरिभाऊ नेमजी काळे (वय 20) व परहरी नेमजी काळे (वय19 सर्व रा. मुठेवडगाव ता. श्रीरामपूर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लोणी (ता.राहाता) येथील आठवडे बाजारातून रेडमी कंपनीचा मोबाईल खिशातून अज्ञात चोरट्याने नेल्याच्या फिर्याद रविंद्र भाऊसाहेब गागरे (रा.दुर्गापूर ता. राहाता) यांनी लोणी पोलिस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना मोबाईल हा सचिन काळे, हरिभाऊ काळे व परहरी काळे या तिघांनी चोरला असून, ही तिघेही मेठेवडगाव (ता.श्रीरामपूर) येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार तिघांना मेठेवडगाव येथे पकडण्यात आले. सदर गुन्ह्याची कबुलीही दिली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल जप्त केला आहे. पोहेकॉ मनोज गोसावी, पोना रविंद्र कर्डिले, सचिन आडबल, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, पोकॉ जालिंदर माने, चापोेहेकॉ संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.  

Post a Comment

0 Comments