Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हास्तरीय आयोजित निबंध स्पर्धेत हर्षिता जयंत गायकवाडचा पहिला क्रमांक


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शिर्डी ः  महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर तसेच तहसील कार्यालय, राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  या कार्यक्रमानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत राहाता येथील शारदा कन्या विद्यालयातील हर्षिता जयंत गायकवाड हिने प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी पारितोषिक व प्रमाणपत्र देत गौरव केला.
हर्षिता गायकवाड ने आपल्या निबंधात ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाल्याचे सांगितले सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा अधिकार, म्हणणे मांडण्याचा हक्क, तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क आणि ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार याबाबतीत हर्षिता ने पंचायत समिती सभागृहात झालेल्या याच कार्यक्रमात प्रभावी भाषण करीत ’मी पुन्हा येईल’ चा गजर केल्याने सभागृहात एकच हशा पिकला.
यावेळी पंचायत समिती सभापती हिराताई कातोरे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, सहायक पुरवठा अधिकारी सुनिल सैंदाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए. ए. खान, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे , जि. प. सदस्य दिनेश बर्डे, कृषी सभापती रायभान आहेर व ग्राहक संरक्षण सल्लागार समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले.  आभार प्रदर्शन गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून झाली. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, विद्यार्थी व ग्राहक संरक्षणासाठी कार्य करणार्‍या सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments