Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मनपातील कर्मचा-यांचा ग्रुप तयार करून त्‍यांचे मार्फत स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात यावी : महापौर वाकळे


 आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 अहमदनगर -  महानगरपालिकेच्‍या वतीने अहमदनगर शहरामध्‍ये स्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण अभियान अंतर्गत स्‍वच्‍छता मोहिम सुरू आहे. स्‍वच्‍छतेसाठी सर्व क्षेत्रातील नागरिकांना स्‍वच्‍छतेमध्‍ये भाग घेण्‍याबाबत जनजागृती करण्‍यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी या स्‍वच्‍छता सर्व्‍हेक्षण अभियानात सहभाग घेवून मनपास सहकार्य करावे असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केलेले आहे.
 अहमदनगर शहरातील ब-याच भागातील रस्‍त्‍याच्‍या कडेने गवत वाढलेले आहे. तसेच साईड पट्टया खराब झालेल्‍या आहेत. सदरच्‍या साईटपट्टया स्‍क्रीपींग करणे व रस्‍त्‍याच्‍या कडेने वाढलेले गवत व काटेरी झाडे झुडपे काढल्‍यास शहर सौदर्यात भर पडणार आहे. व परिसर स्‍वच्‍छ होण्‍यास मदत होणार आहे. त्‍याकरिता कामगारांची गॅग तयार करून त्‍यांचे मार्फत मोहिम राबविणेत यावी व रस्‍त्‍याच्‍या कडेने वाढलेले गवत काढणे व काटेरी झाडे झुडपे काढणे बाबत संबंधीत विभागास आदेश व्‍हावेत, अशा आशयाचे पत्र महापौर  यांनी आयुक्‍त साहेब यांना दिलेले आहे.

Post a Comment

0 Comments