आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - नाताळ व नुतन वर्षाच्या पार्श्वभूमी वर नेमलेल्या विशेष पथकांनी बुधवार दि. २५ रोजी गव्हाणेवाडी, दाणेवाडी येथे हातभट्टी निर्मिती केंद्रावर व वाळवणे, टाकळी ढोकेश्वर येथे अवैध देशी-विदेशी मद्याची वाहन तपासणी करताना दारुबंदी गुन्हा अन्वेषण विभागात ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत आरोपी नामे संजय मारुती कार्ले, आप्पासाहेब मारुतराव काळे व सुनिल हनुमंत दाते यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून देशी-विदेशी मद्य, हातभट्टी गावठी दारू, एक महिंद्रा कंपनीची स्कारपिओ जीप, एक हुंडाई कंपनीची वेरना कार अशी दोन चारचाकी वाहने व एक टिव्हीएस कंपनीची ज्युपीटर दुचाकी वाहन मद्य वाहतूक करताना जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण १४ लाख १३ हजार ७५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच ५,७०० लिटर रसायन नाश करण्यात आले.
सदरची कारवाई प्रसाद सुवे (विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शल्क. पुणे विभाग) यांच्या आदेशान्वये व पराग नवलकर (अधीक्षक, राज्य उत्पादन शल्क अहमदनगर) व सी. पी. निकम, (उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर) यांच्या सूचनेनुसार संजय एम. सराफ (निराक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अ-विभाग, अहमदनगर) बी. बनकर (निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ब-विभाग, अहमदनगर) यांनी केली. कारवाईत दुय्यम निरीक्षक जी. आर. चांदेकर, एस. एस. भोसले, महिपाल धोका, व्ही. जी. शी, जवान नि वाहन चालक पांडुरंग गदादे, महिला जवान स्विटी राठोड, जवान निलेश शिंदे, अरुण जाधव, योगेश मडके, वसंत पालवे, सचिन वामने, अविनाश कांबळे, भरत तांबट, नंदकुमार ठोकळ यांनी सहभागी होते. पुढील तपास निरीक्षक संजय सराफ व अण्णासहेब बनकर करीत आहेत.
0 Comments