Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्हा नियोजन समिती पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अनिल शिंदे व राष्ट्रवादीचे विनित पाऊलबुद्धे विजयी

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्हा नियोजन समितीच्या महानगरपालिका गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे हे 49 मते घेऊन विजयी झाले तर शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा जाधव यांना 14 मतावरच समाधान मानावे लागले असून यांना झालेल्या मतदानापैकी 4 मते बाद झाली. दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांनी 52 मते घेऊन विजयी झाले तर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे नगरसेवक अमोल येवले यांना 10 मते पडली तर झालेल्या मतांपैकी 5 मते बाद झाली.
यापूर्वीच जिल्हा परिषद प्रवर्गातून धनराज शिवाजी गाडे(राष्ट्रवादी), नगरपालिका प्रवर्गातून गणेश बाबासाहेब भोस(राष्ट्रवादी) व मनपा महिला प्रवर्गातून आशा काळे(भाजप) ही सर्वजण बिनविरोध निवडून आले आहेत. तर फक्त दोन जागा यात मनपा सर्वसाधारण एक जागेसाठी तर नागरीकांचा मागास प्रवर्गाच्या एका १ जागेसाठी झालेल्या मतदानाची गुरुवार (दि.२६) मतमोजणी झाली. यात अनिल शिंदे ५२ मते (शिवसेना) तर नागरीकांचा मागास प्रवर्ग मधून विनित पाऊलबुधे ४८ मते (राष्ट्रवादी) घेऊन विजयी झाले.
३ जागेपैकी १ जागेवर भाजपाच्या आशा कराळे बिनविरोध निवडून आल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments