Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची ३१ डिसेंबरला निवडणूक


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई विखे व उपाध्यक्षा घुले याचा कार्यकाळ शुक्रवार (दि.२०) रात्री १२ वा. संपला आहे. नव्याने या दोन्ही पदासाठी सर्व साधारण महिला उमेदवार या प्रवर्गातून ही निवडणूक मंगळवार दि.३१ डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व उपाध्यक्षाच्या कार्यकाळाची मुदत शुक्रवार दि.२० डिसेंबरला संपुष्टात आली. यानंतर १० दिवसाच्या आत नव्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होणे आवश्यक असते. त्यानुषंगाने अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक ही मंगळवार दि.३१ डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या शिवाजी महाराज सभागहात होणार आहे. यावेळी ११ ते १ यावेळेत पीठसन अधिकारी यांच्याकडे उमेदवारी भरण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वा. छाननी झाल्यानंतर माघारी घेण्याची प्रक्रिया होईल. यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष या दोन्ही पदासाठी निवडणूक होणार आहे.

Post a Comment

0 Comments