Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हिवताप योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरास नगर जिल्हा शाखेचा तीव्र विरोध

                                 फोटो संग्रहित
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - हिवताप विभागातील 13 हजार कर्मचाऱ्यांना प्रशासकीय सुसुत्रतेसाठी राज्यातील जिल्हा परिषदांकडे वर्ग करण्याचा राज्यात निर्णय राष्ट्रपती राजवट असतांना घेण्यात आला. या निर्णयाने जिल्ह्यातील हिवताप विभागाशी संलग्न कर्मचारी जिल्हा परिषदेत वर्ग होणार आहेत. या निर्णयाच्या विरोधात 13 हजार कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. तर शासकीय परिपत्रकानुसार हिवताप योजनेचे जि.प.कडे हस्तांतरण करण्याची कार्यवाही सुरु झालीय. हिवताप योजना विरोधी हस्तांतरण समन्वय समिती, अहमदनगर जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा हिवताप कार्यालयाच्या प्रांगणात तातडीची बैठक आयोजित करुन या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविण्यात आला. या निर्णयाविरोधात धरणे, मोर्चा, उपोषण आदि सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येऊन त्यात 100 टक्के सक्रिय सहभागी होणार असल्याचे मत बैठकीत अनेकांनी मांडले. जुने सिव्हील हॉस्पिटल चितळे रोड येथील जिल्हा हिवताप कार्यालयाच्या प्रांगणात कर्मचार्यांनी विरोधी घोषणा दिल्या. हा निर्णय घेतांना कर्मचार्यांना विश्वासात न घेता, नियमित कामकाज व जबाबदार्यांना अडचणीचे आणणारे परिपत्रक दि.22 नोव्हेंबर रोजी काढून हिवताप व हत्तीरोग विभागाचे विभाजन करण्याचा घाट घालण्यात आला आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्यातील कर्मचार्यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यात नगर जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले आहेत, अशी माहिती श्री.सावंत यांनी यावेळी दिली.
प्रास्तविक श्री.आडेप यांनी केले तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांनी या निर्णयाच्या बाबतीत सविस्तर महिती दिली. यानंतर जिल्हा समितीच्यावतीने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रजनी खुणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी श्री.पुरुषोत्तम आडेप, श्री.पोळ, श्री.सावंत, श्री.चोळके, निलेश वैराळ आदि उपस्थित होते. सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्ह्यातील तालुका आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप), प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेवक, क्षेत्र कर्मचारी तसेच सर्व संवर्गनिहाय संघटनांचे पदाधिकारी आवर्जुन उपस्थित होते.
याबाबत जिल्ह्यातील मंत्री व सर्व आमदारांना निवेदन पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तालुकास्तरावर या निर्णयाविरोधात बैठका आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. राज्य समन्वयक समितीकडून येणार्या सूचनांचे पालन करणे आदि सूचना यावेळी देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments