आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - चोरलेल्या चंदनाची लाकडे विकण्यासाठी निबोंडी शिवारात येणार आहेत. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडून २ किलो चंदनाची लाकडे, टाटा जेस्ट गाडी व ३ मोबाईल असा मुद्देमाल ताब्यात घेतला. बंडू अशोक बोद्रे (वय२७, लोणी सय्यद मीर, ता.आष्टी जि.बीड), तेजस महादेव मुठे (वय २४ रा.कुभेफळ, ता.आष्टी जि.बीड, हल्ली रा.बोल्हेगाव फाटा, काकासाहेब म्हस्के काँलेजमागे,अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. या आरोपींकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे भिंगार कँम्प पोलिसांनी सांगितले.
प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली भिगांर कँम्प पोलीस ठाण्याचे सपोनि प्रविण पाटील यांच्या सूचनेनुसार सफौ राजेंद्र मुळे, पोहेकाँ अजय नगरे, पोनी जालिंदर आव्हाड, पोना राजेंद्र सुद्रीक, भानुदास खेडकर, भागचंद लगड यांनी ही महत्त्व पूर्ण कारवाई केली आहे.
0 Comments