Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दैत्यनांदूर हत्याकांडातील तीन आरोपी अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची जलदगतीने कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथील हत्याकांडातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाच्या आत अटक करून पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्याची जलदगतीने कारवाई केली.
ज्ञानेश्वर विष्णू दहिफळे ( वय २८), राहुल शहादेव दहिफळे (वय २२) व भागवत हरिभाऊ नागरगोजे (वय ५०) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दैत्य नांदूर (ता.पाथर्डी) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या कारणातून शहादेव पंढरीनाथ दहिफळे याने संजय बाबासाहेब दहिफळे व गणेश रमेश दहिफळे यांच्यावर बंदुकीने गोळीबार करून आरोपी विष्णू पंढरीनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर विष्णू दहिफळे, द्वारका भागवत नागरगोजे, विष्णू दहिफळे यांची पत्नी, शहादेव दहिफळे यांची पत्नी व दोन मुले, ज्ञानेश्वर दहिफळे यांची पत्नी, पंढरीनाथ दहिफळे, अनिकेत भागवत दहिफळे (सर्व रा.दैत्य नांदूर ता.पाथर्डी) यांनी संजय बाबासाहेब दहिफळे, गणेश रमेश दहिफळे यांना लाकडी दांडके व कु-हाडीने मारहाण करून संजय बाबासाहेब दहिफळे याची हत्या केली. गणेश रमेश दहिफळे यास जिवे मारण्याचा प्रयत्न करून साक्षीदार ज्ञानेश्वर अशोक दहिफळे यास जखमी केले. या घटनेबाबत गणेश रमेश दहिफळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन पाथर्डी पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, ७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३)१३५ प्रमाणे सर्व आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी व अहमदनगर येथे शोध घेऊन ज्ञानेश्वर विष्णू दहिफळे, राहुल शहादेव दहिफळे व भागवत हरिभाऊ नागरगोजे याना पकडून पाथर्डी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांनी वेगवेगळ्या पथकाना दिलेल्या सुचनेनुसार पोसई गणेश इंगळे, पोहेकाँ विजय वेठेकर, रविंद्र कर्डिले, मन्सूर सय्यद, आण्णा पवार, संदीप घोडके, सागर गंवादे, रणजित जाधव, रोहिदास नवगीरे, रोहित मिसाळ, कमलेश पाथरूड, राहुल सोळुंके, दत्तात्रय गव्हाणे, शिवाजी ढाकणे, सचिन आडबल, सागर ससाणे, सागर सुलाने, रवि सोनटक्के, विनोद मासाळकर, विजय धनेधर, देवेंद्र शेलार, जालिंदर माने, संभाजी कोतकर, बाळासाहेब भोपळे आदींच्या पथकांनी ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments