Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगार छावणी परिषद शाळेची शैक्षणिक वाटचाल उज्वल दिशेने : शहर पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके

छावणी परिषद शाळेचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - भिंगार छावणी परिषद शाळेच्या विद्यार्थांनी क्रीडा ,वारली , कलेच्या व शैक्षणिक क्षेत्रात जी उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यामुळे दिल्ली येथील ललित कलाअकादमीमध्ये त्यांना कला सादर करण्याची संधी मिळाली. हे यश विद्यार्थ्यांच्या कष्टाचे शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे असल्याचे प्रतिपादन पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी अध्यक्षपदावरून बोलताना केले. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कँन्टो.बोर्डाचे मुख्य.कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार ,भिंगार कँम्पचे सहा.पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,आरोग्य समिती चेअरमन शुभांगी साठे, सदस्य रविंद्र लालबोंद्रे, हरदिनचे संजय सपकाळ,कँन्टो.माजी. उपाध्यक्ष अँड.आर आर पिल्ले,स्नेहबंधचे उद्वव शिंदे , महेष नामदे,सुभाष पाटील,प्रमोद मुळे कार्या.अधि.उज्वला पारनाईक,शाळा. व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास मोहिते,कारभारी आव्हाड, आशालता बेरड,खैरमहंमद खान आदि उपस्थित होते.

मिटके पुढे म्हणाले,शाळेतील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यामधून त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास निश्चित मदत होत आहे.म्हणून अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
शुभांगी साठे म्हणाल्या, छावनी परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विविध सोयीसुविधांबरोबरच गणवेश,शुज सॉक्स बोर्डाने मागील कळात उपलब्ध करून दिले असून शाळेबाबतीत बोर्डाचा उद्देश नेहमीच सकारात्मक राहिलेला आहे.
यावेळी कँन्टो.बोर्डाचे मुख्य.कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार,प्रवीण पाटील, आरोग्य समिती सभापती शुभांगी साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
विविध क्षेत्रात यश संपादन करणा-या विद्यार्थ्याना पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी अरविंद कुडिया यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यर्थ्यांनी काढलेल्या वारली चित्रांच्या व ऐतिहासिक अहमदनगर शहराची ओळख करून देणा-या विवध चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यास पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक संजय शिंदे अहवाल वाचन मुख्याध्यापिका आशालता बेरड यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगावर अधारित नेत्रदिपक नृत्याने उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. तसेच पालकही भारावून गेले. शामली साळवे व स्वालेहा शेख यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांना प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली.यावेळी मोठया संख्येने पालक उपस्थित होते. आभार अरविंद कुडिया यांनी मानले.

Post a Comment

0 Comments