Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निवृत्त जवानाच्या गोळीबारात चौघे जखमी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील निंबेदैत्य नांदूर येथे गावातील राजकीय वादातून दोन गटात झालेल्या गोळीबारात सरपंचासह चार जण जखमी झाले. ही घटना आज सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेतील दोन जखमींना अत्यवस्थ अवस्थेत नगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ज्ञानेश्वर अशोक दहिफळे (वय ३०),गावचे सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे (वय ५०) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनाच पुढील उपचारासाठी त्यांना नगरला हलवण्यात आले आहे. भीमराज जिजाबा दहिफळे (वय ६०), सदाशिव अर्जुन दहिफळे (वय ५०) हे किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पोलीस ठाण्यात घटनेची नोंद होत होती.
या घटनेतील गंभीर जखमी सरपंच संजय दहिफळे यांचे गावातीलच निवृत्त जवान शाहदेव उर्फ पम्प्या पंढरीनाथ दहिफळे यांच्याशी राजकीय वैर होते. या दोघांमध्ये पूर्वी तीन ते चार वेळा वाद सुद्धा झालेले होते. आज सायंकाळी सातच्या सुमारास गावातीलच गोपीनाथ मुंडे चौकात दोन्ही गटात मारामारी झाली. त्यात शाहदेव दहिफळे यांनी आपल्याकडे असलेल्या पिस्तूलमधून संजय दहिफळे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या वेळी झालेल्या मारामारीत संजय दहिफळे यांच्या गटाचे ज्ञानेश्वर दहिफळे यांच्या डोक्याला जबर मार लागला. भीमराज दहिफळे व सदाशिव दहिफळे यांना किरकोळ मार लागला. या सर्व जखमींना गावातीलच काही तरुणांनी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता मोठी गर्दी जमा झाल होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद गर्जे यांनी संजय दहिफळे व ज्ञानेश्वर दहिफळे यांच्यावर प्रथमोचार करून पुढील उपचारासाठी नगरला पाठवले आहे.

Post a Comment

0 Comments