Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नागरदेवळे येथील प्रतिम हॉटेल मालकासह एकावर चाकूहल्ला


ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः नागरदेवळे येथील प्रितम हॉटेल मालकासह अन्य एकावर  चाकूहल्ला झाल्याची घटना रविवारी (दि.15) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. जखमीला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 याबाबत समजलेली माहिती अशी की, नागरदेवळे येथील प्रितम हॉटेल  मध्ये जेवण मागत असताना आरोपी सोप्या उर्फ स्वप्निल आदित्य पाखरे व मालक किशोर रामचंद्र धाडगे व पुतण्या प्रितम मारुती धाडगे यांच्या शाब्दीक चकमक झाली. या दरम्यान, आरोपी पाखरे याने हॉटेल मालक किशोर धाडके व प्रितम धाडके या चुलत्या पुतण्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात किशोर धाडगे हे जबर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयाक उपचारार्थ दाखल केले आहे. याप्रकरणी किशोर रामचंद्र धाडगे (रा.नागरदेवळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात सोफ्य उर्फ स्वप्निल आदित्य पाखरे यांच्याविरोधात भादवि कलम 326, 232, 504 अन्वये गुन्हा नोेंदविण्यात आला आहे. आरोपी पाखरे हा या घटनेनंतर फरार झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास हेडकॉ आघाव हे करीत आहेत.   

Post a Comment

0 Comments