आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : - नगर तालुक्यात टेंंडर पद्धत घेऊन बाप्पूचा मोठ्या दिमाखात थाट माट सुरू होता. अन् टेंडर पूर्ण करण्यासाठी बाप्पूने सुरवातही केली दोनजण सोबत घेऊन,मुकादमाला हजेरी लावायचे पैसेही बरोबर भेटायचे. आता झाल अस बाप्पू साहेबांच्याच संपर्कात असल्याने बाप्पूला कोण कशाला काय बोलल. म्हणून सर्वजण हळूहळू कुजबूज करायला लागले,ही कुजबूज मोठ्या साहेबांपर्यत गेली अन् मोठ्या साहेबांने बाप्पू सहीत त्या तालुक्यातील तिंघा चौघां पोलीस कर्मचाऱ्यांना पकडण्याचा विडा विचलला.
पण ज्या दिवशी मोठ्या साहेबांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांना पकडायच ठरवल, त्या दिवशी बाप्पूच नशीब म्हणून तो टेंडर घेतलेल्या कामावर नव्हता.अन् दोन अन्य पोलीस कर्मचाऱ्याना कामाला लावून बाप्पू निसटला. मोठ्या साहेबांनी त्या रंगेहाथ पकडून दोघांचा चांगलाच समाचार घेतला, पण चार चौघात बोभाटा नको, म्हणून त्यांची उचलबांगडी करत बिचाऱ्या त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या साहेबांने थेट मुख्यालय दरबारी कामात धाडल. बाप्पू मात्र मी काही केलच नाही आणि मला काही माहितच नाही, अस म्हणत मस्त मजेत सध्या छोटे छोटे टेंडर घेत आहे. छोट्या साहेबाला खुश करत असल्याने मालकही जाम खुश आहे. बाप्पू आता साहेबांची सर्व कामे करतो अन् साहेबचा खिसा पण चांगलाच गरम करत असल्याची चर्चा आता मोठ्या साहेबांच्या कानावर कधी जाणार याबाबत सगळ्याचेच लक्ष लागले आहे. या तालुक्यातील पोलिसांच्या सावळागोंधळ कारभाऱ्याची चर्चा तालुक्यासह नगर शहरात चांगलीच रंगली आहे.
0 Comments