Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनी पुरस्कार वितरण


जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा  - बाळासाहेब जाधव

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : - जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पत्रकार दिनाच्या दिवशी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीनी प्रस्ताव पाठविण्यात यावेत.असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी केले आहे.
आद्य  पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन साजरा केला जातो.राज्यात पत्रकारांचा सन्मान केला जातो. पत्रकारांना बरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला आदर्श पुरस्काराने गौरविण्यात आले तर त्यांना काम करण्यास प्रोत्साहन मिळेल या भावनेने पत्रकार दिनाचे औचित्य साधून संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली  अहमदनगर जिल्हा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, प्रशासकीय, पत्रकारिता, समाजप्रबोधन ( लोककला ), उद्योग,  आरोग्य, प्रगतशील शेतकरी,  राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्ययक्तींना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. पुरस्कार प्रस्तावाची छाननी करुन निवड समिती पुरस्कारकर्त्यांची नावे दि.३ जानेवारीला जाहीर करण्यात येतील.पत्रकार दिनी जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान व पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव संघटनेचे केंद्रीय, प्रदेश पदाधिकारी,  प्रशासकीय अधिकारी ,जेष्ठ पत्रकार, राजकीय मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तरी निबंध स्पर्धेत भाग विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींनी दि.२० डिसेंबर पर्यंत दोन पासपोर्ट फोटोसह उल्लेखनिय कामाची माहिती (प्रस्ताव ) बाळासाहेब  मुरलीधर जाधव मु.बक्तरपूर पो.देवटाकळी ता.शेवगाव जि.अहमदनगर पिन-४१४५०२ या पत्यावर पाठविण्यात यावेत. पुरस्काराचा स्पष्ट उल्लेख करावा. उशिरा येणाऱ्या पुरस्कार प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही.  उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींनी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवून  सहभागी  व्हावे.असे आवाहन अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, सरचिटणीस शंकर मरकड, दक्षिण कार्याध्यक्ष दिपक खोसे,संपर्क प्रमुख भाऊ कदम,तालुकाध्यक्ष दीपक दातीर, नारायण चोरमले यांच्यासह जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले  आहे.

Post a Comment

0 Comments