Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्वच्छता जनजागृतीसाठी उपमहापौरांचा नागरिकांना ‘स्वच्छ नमस्कार’

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : शहरातील प्रत्येक नागरिकांनी माझे नगर माझे अभियान हे ध्येयधोरण बाळगून स्वच्छ सुंदर व हरित नगर करण्यासाठी मनपाला सहकार्य करावे. कचराकुंडी मुक्त शहर करण्यासाठी नागरिकांनी आपला ओला व सुका कचरा डस्टबीन मार्फत थेट घंटागाडीमध्ये टाकावा. स्वच्छ व सुंदरमुळे नागरिकाचे आरोग्य निरोगी व सदृढ राहण्यास मदत होईल. यासाठी मी आजपासून नगर शहरामध्ये सकाळी घरोघरी जावून स्वच्छ नमस्कार घालून महिला व मुलींमध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती करणार आहे, असे मत उपमहापौर मालन ढोणे यांनी व्यक्त केले.

स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत मनपा व चाणक्य फाउंडेशनच्या वतीने ‘स्वच्छ नमस्कार’ उपक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी उपमहापौर ढोणे यांनी चितळे रोड परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांना ‘स्वच्छ नमस्कार’ घालत स्वच्छतेबाबत जनजागृती केली. यावेळी अ‍ॅड. प्रसन्ना जोशी, मुख्य स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख, अमित गटणे, सुहासीनी बडवे, स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते, राजू सामल, गौरव भालेराव, संजय उमाप, दत्तू शिंदे, विकी पवार, दत्ता देठे आदींसह महिला, युवती, नागरिक उपस्थित होते.
उपमहापौर मालनताई ढोणे यांनी मंगळवारी (दि.24) सकाळीच चितळे रोड परिसरात जावून नागरिकांच्या घरी थेट संवाद साधला. या उपक्रमात त्या पहिल्यांदा नागरिकांना स्वच्छ नमस्कार घालतात व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे काम करतात. ओला व सुक्या कचर्‍याचे वर्गीकरण करुन आपला कचरा घंटागाडीमध्ये टाकावा. रस्त्यावर कोणीही कचरा टाकू नये. नागरिकांनी आपल्या घराच्या कचर्‍यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्याचे काम करावे. कचर्‍यापासून बायोगॅस निर्मिती घरोघरी आपण करू शकतो. कचरा मुक्तीसाठी आपण सर्वांनी एकत्र येवून लोकचळवळ उभी करावी. नगर शहर देशामध्ये स्वच्छ, सुंदर व हरित शहर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शासनाच्या स्वच्छता अभियानामध्ये भाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख व अ‍ॅड. प्रसन्ना जोशी यांनीही नागरिकांना स्वच्छते संदर्भात मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments