Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सोलापूर येथे ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र ५ जानेवारीला उदघाटन सोहळा


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
सोलापूर - स्वच्छ व सुंदर अशा नावलौकिक मिळविलेल्या सोलापूर शहरामध्ये ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र या संघटनेचा उद्घाटन सोहळा दि ०५ जानेवारी २०२० रविवारी होत आहे. सर्व सोलापूर जिल्हा व शहरातील समाज बांधव व भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक उमेश काशीकर व मंदार कुलकर्णी यांनी केले आहे.
या सोहळ्यास संस्थापक अध्यक्ष आनंदजी दवे, प्रदेश प्रवक्ते तुषार निंबर्गी, प्रदेश कार्याध्यक्षा सौ स्मिता कुलकर्णी, प्रदेश संपर्कप्रमुख सौ माधुरीताई कुलकर्णी पुरोहित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव कडेकर देवा, उपाध्यक्ष अमोल चिंचाळे अकोला, जळगांवच्या वरिष्ठ पत्रकार ज्योती भागवत, राजु दादा कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्यास पंचांगकर्ते श्री मोहनजी दाते व वेदमूर्ती वेदभुषण ज्योतीषाचार्य श्री वा ना उत्पात, युवा नेते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी व राघवेंद्र आद्य गुरूजी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नागेश जोशी, संतोष काकडे, विशाल काटीकर, ज्ञानेश्वर पंचवाघ , राहुल कुलकर्णी, अनिल देशपांडे, किरण कुलकर्णी,श्रीकांत कुलकर्णी, संजय पिंगळे सौ अनुजा कस्तुरे, आरती काशीकर, स्नेहल लऊळकर, अनिता बेले, दिपाली कुलकर्णी, सारीका कुलकर्णी, अमृता कुलकर्णी, वंदना कामतकर हे परिश्रम घेत आहेत अशी माहिती स्वागोत्सुक उमेश काशीकर व मंदार कुलकर्णी यांनी सांगितले आहे. अधिक माहिती साठी 99758 82556 या नंबरवर संपर्क साधवा, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments