Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव पोलिसांचा मुस्लिम समाजातर्फे सत्कारआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शेवगाव : शहरात सालाबादप्रमाणे ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रोत्सव व हिंदू मुस्लिम समाजाचे दैवत हजरत सोनामियाँ वलीसाहेब यात्रोत्सव शांततेत मार्गा लावल्याबदल मुस्लिम समाजाच्या वतीने शेवगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.
सालाबादप्रमाणे शहरात पंधरा दिवसापूर्वी ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रोत्सव व या आठवडयात हजरत सोनामियाँ वलीसाहेब या दैवतांचा यात्रोत्सवाचे यात्रा कमिटीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या यात्रोत्सवासाठी राज्यातून भाविकभक्त दर्शनासाठी येत असतात. दोन्ही यात्रेसाठी सर्व जातीधर्माचे नागरीक मोठया उत्सहाने या यात्रोत्सवात सहभागी होत असतात. मात्रील काही वर्षापासून या यात्रोत्सवामध्ये काही विघ्न संतोषी समाजकंठकाकंडून अफवा पसरवून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यावर्षी मात्र शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी सर्व जाती धर्मांच्या नागरीकांध्ये विश्वास निर्माण करत दोन्ही यात्रेमध्ये नियोजन पुर्वक बंदोबस्त लावून हा यात्रोस्तव शांततेत पार पाडला. ढिकले यांना दोन्ही यात्रा कमिटीचे अध्यक्ष उमर शेख, गणेश कोरडे, उपनगराध्य वजीर पठाण, विनोद मोहीते, खजिनदार सागर फडके, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर आदींनी त्यांना मदत केली.
यात्रोत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे, विश्वास पावरा, गुप्त वार्ताचे राजेंद्र चव्हाण, पो.काँ. राजू केदार, महादेव घाडगे, किशोर शिरसाठ, सुधाकर दराडे, संदीप दरवडे, बाळासाहेब ताके, अभय लबडे, राजेंद्र नागरगोजे आदींसह इतर कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवकचे ता.कार्याध्यक्ष ताहेर पटेल, अलीम शेख, आयुब पठाण, सर्फराज पठाण, राज काझी, समीर शेख, बाबा तांबोळी, छनुभाई पठाण, रिजवान शेख, कादीर शेख, अश्पाक पठाण, आपण इनामदार आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments