Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उपजिल्हाधिकाऱ्यासह दोन कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ पकडले


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
सांगली - येथील औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयात उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अपिलीय अधिकारी - वर्ग१ स्वाती मारुती शेंडे, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक सुभाष मारुती माळी व कंत्राटी लिपिक सुनील भुपाल कुरणे यांना ५ हजाराची लाच घेतल्यानंतर रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत कारवाई सुरु होती.
याप्रकरणी समजलेली माहिती अशी की, तक्रारदाराने पत्नीच्या नावे कडेगाव औद्योगिक विकास महामंडळ येथे ९५ वर्षाच्या कराराने प्लाँट घेतलेला आहे. त्या प्लाँटवर व्यवसाय करण्यासाठी बांधकाम केलेले आहे.सदर व्यवसायासाठी राँ मटेरियल खरेदीसाठी तक्रारदार यांच्या पत्नीस बँकेकडून कर्ज मंजूर झाले आहे. ती कर्जाची रक्कम मिळण्यासाठी सांगली औद्योगिक विकास मंडळाकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज दिला होता, त्याप्रमाणे कन्सेंट प्रमाणपत्र मिळाले होते. दि.९ डिसेंबरला तक्रारदार हे पत्नी सोबत त्रैपाक्षीक करार करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयात गेले, येथील क्लार्क कुरणे यांनी तक्रारदार यांना कन्सेंट प्रमाणपत्र दिल्याच्या मोबादल्यात बक्षीस म्हणून प्रादेशिक अधिकारी शेंडे यांना ५ हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी दि.११ डिसेंबरला अँन्टी करप्शन ब्युरो, सांगली कार्यालयात तक्रार केली होती.
पोलीस उप आयुक्त राजेश बनसोडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे अपर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक राजेंद्र साळुंखे, पो.नि.गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले, पोलीस जितेंद्र काळे, संजय कलकुटगी, संजय संकपाळ, अविनाश सागर, राधिका माने, अश्विन कुकडे, भास्कर मोरे, रविंद्र धुमाळ, श्रीपती देशपांडे, बाळासाहेब पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments