आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
माळवाडगांव (संदिप आसने) - लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सराला बेट ता.श्रीरामपूर येथे सदगुरु योगिराज गंगागिरी महाराजांची ११७ वी पुण्यतिथी व याञा निमित्ताने पूर्व तयारी करण्यासाठी प्रशासकीय बैठक महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
महाराज म्हणाले की, संताचे विचार समाजाला प्रेरणादायी असुन संत हे समाजाच्या कल्यानाचाच विचार करतात, संत पुजणीय आहे, त्यांच्या परंपरा व कार्य पुढे चालवण्यासाठी आपल्याला त्यांच्या पुण्यतिथी, जयंत्या समाजात प्रेरणा निर्माण करत असतात असा मोलाचा उपदेश महंत रामगिरी महाराज यांनी पुण्यतिथी नियोजन बैठकीत केले.
यावेळी वैजापुरचे आमदार रमेश बोरणारे,श्रीरामपुरचे आमदार लहु कानडे यांनी आपले पहिले मिळणारे मानधन हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सराला बेट येथे भाविकांना पिण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंञ बसविण्यावर खर्च केले असल्याचे सांगितले.यावेळी बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज,विरगावचे पोलीस निरीक्षक शेळके,बाबासाहेब जगताप,श्रीरामपूर बस आगारचे विकास चव्हाण,नायब तहसिलदार भालेराव, नायब तहसिलदार गुंजाळ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे चव्हाण,पितळे,आरोग्य विभागाचे डॉ राजगुरू,डॉ बाळासाहेब औताडे,चंद्रकांत सावंत,सचिन जगताप,दत्ता खपके,प्रदिप साळुंके यांची उपस्थिती होती.
0 Comments