Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नायब तहसीलदाराच्या गाडीने उडविले दोघे ; शेवगाव-पाथर्डी रोडवरील घटनाआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - शहरातून नवीन पाथर्डी बसस्थानकामार्गे जाणाऱ्या शेवगाव रस्त्यावर पेट्रोल पंपजवळ नायब तहसीलदाराच्या गाडीने दोघांना उडवल्याची घटना बुधवार (दि.११) सांयकाळीच्या सुमारास घडली. या अपघातात गाडी चालक हा दारुच्या नशेत असल्याची चर्चा घटनास्थळी होती. चालक साबळे याला नागरिकांनी चांगलाच समाचार घेतला. परंतु यावेळी घटनेची माहिती मिळाताच पोलिस घटनास्थळी आल्याने दारुड्या चालक साबळे याला नागरिकांनी पोलीसांच्या ताब्यात दिले. यावेळी गाडीत नायब तहसिलदार हे ही होते. रस्त्याने अनेक हुलकावणी देत गाडी चालवत येत असतानाच हा अपघात झाला, असल्याचे सांगितले जात आहे. अपघातात एकाजणाच्या पायाला लागल्याने पाथर्डी त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समजते.

Post a Comment

0 Comments