Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सोलापूर रोडवर एस.टी बस - स्कार्पिओ अपघात ; नगरचे ३ ठार


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : नगर - सोलापूर महामार्गावरील अंबिलवाडी फाट्यावर एसटी बस आणि स्कॉर्पिओ गाडी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात स्कॉर्पिओ  मधील नगरचे तीन ठार झाले असून चार जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.  याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर येथील स्कॉर्पिओ (एमएच.16, 4477)  ही गाडी पंढरपूरला दर्शनासाठी जात होती.  स्कॉर्पिओ मधील  अरुण फुलसौंदर व अर्जुन भगत व ताराबाई भगत असे तीन ठार झाले आहेत, तर चार जण जखमी  असल्याचे समजले आहे. या घटनेमुळे फुलसौदर व भगत कुटुंबावर शोककळा पसरली आहे.Post a Comment

0 Comments