Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची केंद्रीय कार्यकारिणीच्या राज्य सहसचिवपदी राजेंद्र म्हस्के व शशिकांत रासकर यांची केंद्रीय कार्यकारणी सदस्यपदी बिनविरोध निवड
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - नांदेड येथे नुकतीच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. 
बैठकीत ग्राम विकास विभागाकडील १५ मे २०१४ चा बदली शासन निर्णय हा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक असून त्यामध्ये सुधारणा करून विनंती बदलीसाठी १ वर्ष सेवा कालावधी करणे, समानीकरणांच्या नावाखाली बदल्या न करणे, जुनी पेन्शन योजना सुरू करणे, डि.सीपी. एस धारकांचे लेखे अद्ययावत करणे, खास बाब बदलीचे अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देणे, महाराष्ट्र पोलीसांप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम सुविधा देणे, एसीबी प्रकरणी जि.प.कर्मचारी यांना साक्षीसाठी न बोलवणे, लोकसभा, विधानसभा निवडणूक प्रलंबित भत्ता मिळणे, या आणि जि.प.कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दष्टीने अनेक मागण्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास साळुंके यांनी राज्य कार्यकारिणी पुढे मांडल्या. जि.प.कर्मचार्यांनी तीव्र भावना असल्याने प्रलंबित मागण्यांचा तातडीने सोडवणूक करावी, अन्यथा जि.प.कर्मचारी हे बेमुदत संपावर गेल्याशिवाय राहणार नाही, अश्या भावनाही यावेळी कर्मचाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केल्या.
केंद्रीय कार्यकरणीच्या बैठकीत राजेंद्र म्हस्के यांची राज्य सहसचिव व शशिकांत रासकर यांची केंद्रीय कार्यकारणी सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी केंद्रीय कार्यकारणी तील युनियनचे राज्य उपाध्यक्ष सुभाष कराळे, कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष विकास साळुंके, विभागीय संघटक शशिकांत रासकर, कार्याध्यक्ष सुनील सरोदे, जिल्हा सचिव किशोर शिंदे, उपाध्यक्ष सुखदेव महाडीक, संतोष नलगे आदिंसह सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments