Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

त्रिमुखे हार्ट अँड चेष्ट सुपरस्पेशालिटी हाँस्पिटलच्या शुभारंभ


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - भिंगार येथील हृदयरोग तज्ञ डॉ.राहूल त्रिमुखे यांच्या मध्ये उत्तम व्यक्तीमत्व अभ्यासू वृत्ती परिपूर्ण ज्ञान हे चांगल्या डॉक्टरांचे गुण आहेत.तो रुग्णांच्या वेदना जाणणारा डॉक्टर आहे.त्याने सर्व सुविधांनी उभारलेल्या त्रिमुखे हार्ट व चेस्ट सुपरस्पेशालिटी हाँस्पिटलमध्ये रुग्णांना निश्चितच लाभ होईल असे प्रतिपादन पुणे येथील  हृदयरोग डॉ सुहास हरदास यांनी केले.
नगर मधील मार्केट यार्ड मध्ये त्रिमुखे हार्ट अँड चेष्ट सुपरस्पेशालिटी हाँस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी डॉ.हरदास बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर हे होते.याप्रसंगी आ.अरुण जगताप आ.संग्राम जगताप मा.खा.दिलीप गांधी भाजपाचे अभय आगरकर मनपा महापौर बाबासाहेब वाकळे नवामराठाचे संपादक सुभाष गुंदेचा हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घुले कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विलास शिंदे संचालक अभिलाष घिमे जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे आर.डी.मंत्री जिल्हा बँक जनरल मँनेजर सिद्धार्थ वाघमारे किशोर भिंगारकर आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.
प्रारंभी पुणे येथील सुप्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ.सुहास हरदास यांच्या हस्ते हाँस्पिटलचे उदघाटन करण्यात आले.डॉ.राहूल त्रिमुखे यांनी प्रास्ताविकात हाँस्पिटल मधील सेवा सुविधां विषयी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी हृदयरोग तज्ञ डॉ.राहूल त्रिमुखे व छाती व फुफ्फुस विकार तज्ञ डॉ.सौ.प्रणाली त्रिमुखे यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी डॉ.बापूसाहेब कांडेकर डॉ.प्रकाश गरुड डॉ.सुराणा डॉ.वीर डॉ.अभय मुथा डॉ.दिनेश कदम अँड प्रकाश गटणे डॉ.धनंजय कोकणे उपस्थित होते.
सर्वसामान्य घरातील मुलगा वैद्यकिय क्षेत्रात नाव मिळतो.त्यामुळे त्यांच्या घराण्याचा व गावाचा देखिल नावलौकिक होतो.डॉ.राहूल व डॉ.सौ. प्रणाली त्रिमुखे हे दोघेही गुणवंत आहेत.यांनी सुरु केलेल्या हाँस्पिटलमुळे आता पुण्यासारख्या शहरात रुग्णांना आता जाण्याची गरज भासणार नाही असे कळमकर म्हणाले. याप्रसंगी विविध मान्यवरांनी गुणगौरवपर आपली मनोगत व्यक्त केली.
डॉ.राहूल हा बालपणापासूनच गुणी मुलगा आहे.त्याने त्याचे धेय्य पूर्ण केले.मात्र त्यासाठी त्याने खूपच मेहनत घेतली.असे सांगून रमेश त्रिमुखे यांनी डॉ.राहूल व प्रणाली यांच्या वैद्यकीय प्रवासाबद्दल माहिती दिली.
डॉ.राहूल हा माझा विद्यार्थी असल्याने त्याच्या गुणवत्ते विषयी पूर्ण कल्पना आहे.तो खूपच अभ्यासू आहे.त्याने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्या रुग्णालयात सराव केला.तेथील अहवाल अभिनंदनीय आहेत.त्याला आता हृदयरोगाविषयी परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे.म्हणूनच त्याने स्वतःचे मोठे रुग्णालय सुरु केले आहे.तपासणीसाठीआधुनिक तंत्रज्ञानाच्या सर्व सुविधा त्याने उपलब्ध करून दिल्या आहेत.विशेष म्हणजे त्याची पत्नी डॉ प्रणाली ही छाती व फुफ्फुस विकार तज्ञ असल्याने हृदयविकारा विषयी अचूक निदान होईल.असे सांगून डॉ.हरदास यांनी हे दोघेही गुणवंत असल्याचे सांगितले.
यावेळी मनपाचे माजी महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक संजय चोपडा प्रकाश भागानगरे गणेश भोसले अजय साळवे जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष सुभाषचंद्र पाटील स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी अध्यक्ष प्रमोद मुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ काँग्रेस कमिटी अध्यक्ष अँड आर आर पिल्ले राणाशेठ परमार आदीं प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.डॉ.प्रणाली त्रिमुखे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments