Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

व्यापाऱ्यांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद ; कोतवाली पोलिसांची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - व्यापारी व ट्रन्सपोर्ट मालकाची मध्येच ९ लाख ७१७ रुपये किंमतीची २३० क्किंटल सोयाबीन स्वतः च्या फायद्यासाठी उतरून फसवणूक करणारे दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी मध्यप्रदेश मध्ये जाऊन अटक केली आहे. ट्रक मालक बबलू उर्फ काशिद रसिद शेख (रा.सेंधवा, जि.बडवाणी राज्य मध्यप्रदेश) व रियाज रज्जक लोहार अशी पकडण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील ट्रक (एपी ९, एम एच ९९१९) चा चालक मुकेश कुमार याचा मध्यप्रदेश मध्ये जाऊन तपास केला असता, तो मिळून आला नाही. परंतु येथे ट्रक मालक हा बबलू उर्फ काशिद रसिद शेख हा असल्याची माहिती मिळाली, त्याचा शोध घेऊन शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला पोलीस खाक्या दाखवताच, सदर गुन्हा हा मी व चालक मुकेश कुमार मिळून केल्याची कबुली दिली. ट्रक व सोयाबीन बाबत विचारले असता, ट्रक च्या बाँडीमध्ये बदल करण्यासाठी गँरेजमध्ये लावल्याची माहिती दिली. गँरेजमधून ट्रक जप्त करून आरोपी काशिद शेख व रियाज रज्जक लोहार याना अटक करण्यात आले. न्यायालयासमोर हजर केले असता, ५ दिवसाची पोलीस कस्टडी दिली. तसेच आरोपींना तात्काळ तपासकामी घेऊन मध्यप्रदेश आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार नेवली (रा.मध्यप्रदेश) येथे रियाज लोहार यांच्या मार्फत रियाज शेख यांना पैसे घेऊन त्याच्या मदतीने मनोज रमेशचंद वाणी यांच्या गोडवूनमध्ये ठेवलेला ६ टन ६८० किलो माल जप्त केला. ट्रक मालक काशिद शेख यांनी सेंदवा (मध्यप्रदेश) येथील ओम ट्रेडसचे मालक दिलीप राठोड यांना सचिन बडवाणी (रा.सेंदवा) यांच्या मार्फत विकलेली सोयाबीन जप्त केली. असा एकूण १५ टन सोयाबीन जप्त केली, असून पुढील तपास चालू आहे. या कारवाईत १५ टन सोयाबीन ६ लाख रुपये तर ट्रक १२ लाख रुपये अशी एकूण १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख ईशू सिंधु, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पो.नि. विकास वाघ, पो.उ.नि. सतिश शिरसाट यांच्या सह पोना आण्णा बर्डे, पोकाँ राहुल शेळके, राजु शेख आदींनी केली आहे.

Post a Comment

0 Comments